'आमचे दागिने मिळाले हीच खरी दिवाळी'

Our jewelry got that is Diwali Festival
Our jewelry got that is Diwali Festival

सोलापूर : गुन्हे होऊ नयेत म्हणून पोलिस दक्ष असतात, शिवाय गुन्हा घडल्यानंतर तो उघडकीस आणण्यासाठीही पोलिस प्रयत्न करतात. चोरट्यांनी चोरून नेलेल्या वस्तू दिवाळीच्या निमित्ताने आम्हाला परत मिळाल्या, आमच्यासाठी हीच खरी दिवाळी आहे, अशा भावना सोलापूरकरांनी व्यक्त केल्या. 

चोरीसह विविध गुन्ह्यांतील 30 लाख 33 हजार 940 रुपयांचा मुद्देमाल मंगळवारी पोलिस आयुक्तालयात नागरिकांना परत देण्यात आला. गुन्हे उघडकीस आणण्यासाठी कर्मचारी आणि अधिकारी दिवसरात्र प्रयत्न करीत आहेत. कायद्याची भीती बसण्यासाठी आरोपींना शिक्षा होणे गरजेचे आहे. सोलापूर शांत आणि विकासाकडे वाटचाल करणारे शहर आहे. ही ओळख कायम ठेवू या, असे आवाहन पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी केले. आमच्या मुलीला मूल होत नसल्याने उपचार करण्याचे आमिष दाखवून घराजवळ राहणाऱ्या महिलेने व तिच्या पतीने आमची फसवणूक करून 250 ग्रॅम सोन्याचे दागिने पळविले होते. पोलिसांनी आरोपींना पकडून आमचे दागिने परत मिळवून दिले. पोलिसांमुळेच दागिने परत मिळू शकले, अशी भावना ज्येष्ठ नागरिक रमेश कंदरे यांनी व्यक्त केली. 
याप्रसंगी पोलिस उपायुक्त मधुकर गायकवाड, गुन्हे शाखेचे उपायुक्त बापू बांगर, सहायक पोलिस आयुक्त डॉ. दीपाली काळे, ऍड. आसिफ जमादार आदी उपस्थित होते. गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त अभय डोंगरे यांनी प्रास्ताविक केले. पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांनी सूत्रसंचालन केले. पोलिस निरीक्षक बाळासाहेब भालचीम यांनी आभार मानले. 

''ज्याप्रमाणे डॉक्‍टर आजार होऊ नये, म्हणून मार्गदर्शन करून औषधे देतात. त्याप्रमाणे पोलिस हे गुन्हा होऊ नये म्हणून झाल्यावर उघडकीस यावा म्हणून सदैव प्रयत्नशील असतात. नागरिकांनीही पोलिसांना मदत करायला हवी. आमच्या घरातून मोबाईल चोरीला गेला होता. पोलिसांनी तपास करून चोरट्यांकडून मोबाईल जप्त केला''.

- डॉ. नागनाथ गंगासागर, नागरिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com