असा सेलिब्रेट व्हायचा आमचा व्हॅलेंटाईन्स डे... प्रशांतभाऊ गडाख सांगतात 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

राजकीय क्षेत्रात काम करणारेही हल्ली मोकळ्या मनाने या प्रेम दिनाविषयी व्यक्त होतात. सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले, राजकीय वारसा असलेले प्रशांतभाऊ गडाख पाटील यांनीही आपल्या व्हॅलेंटाईन्स डेविषयीच्या आठवणी सांगितल्या आहेत. या आठवणी नक्कीच ऐकणाऱ्याच्या ओठांवर हसू आणतील. आणि त्यांच्या अभिमानही वाटेल..

 

नगर ः व्हॅलेंटाईन्स डे अलिकडे तरूणाईचाच नव्हे तर बुजुर्ग लोकांचाही होऊन गेला आहे. सामाजिक संघटना, राजकीय पक्षांचाही विरोध मावळला आहे. त्यामुळे प्रेम करू खुल्लम खुल्ला अशी स्थिती नगर शहरासह जिल्ह्यात आहे. पूर्वी काही राजकीय संघटनांच्या विरोधामुळे चोरी चोरी चुपके चुपके व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेशन व्हायचं.

मनी दाटल्या आठवणी

राजकीय क्षेत्रात काम करणारेही हल्ली मोकळ्या मनाने या प्रेम दिनाविषयी व्यक्त होतात. सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले, राजकीय वारसा असलेले प्रशांतभाऊ गडाख पाटील यांनीही आपल्या व्हॅलेंटाईन्स डेविषयीच्या आठवणी सांगितल्या आहेत. या आठवणी नक्कीच ऐकणाऱ्याच्या ओठांवर हसू आणतील. ते नेमके कोणत्या कॉलेजात शिकले, तिकडे नेमकं काय चालायचं....? 

 

prashantbhau 1

अहमदनगर कॉलेजचे संस्थापक भा.पां हिवाळे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना प्रशांत पाटील गडाख. समवेत मित्रमंडळी.

 

यावर आहे प्रेम

प्रशांतभाऊ हे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव आहेत. गडाख पाटील हे राजकीय क्षेत्रात आघाडीवर असलेले कुटुंब आहे. मात्र, त्यांचा सर्वाधिक वेळ हा सामाजिक कामात जातो. साहित्यातही ते रमतात. प्रशांतभाऊंनी हाच वारसा पुढे चालविला आहे. त्यांचे ज्येष्ठ बंधू शंकरराव हे राज्य सरकारमध्ये जलसंधारण मंत्री आहेत. 

यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी मोठी लोकचळवळ उभी केली आहे. गावंच्या गावं दत्तक घेतली आहेत. ते शिक्षण, साहित्य आणि सामाजिक कामातच रमतात. राजकीय क्षमता असतानाही त्यांनी या कामातच वाहून घेतले आहे. यावर तसेच पत्नी गौरीवर आपलं प्रेम असल्याचे ते  सांगतात. 

अशी झाली जडणघडण 
प्रशांतभाऊ यांचे महाविद्यालयीन शिक्षण अहमदनगर महाविद्यालयात झाले. वडील राजकीय क्षेत्रातील असल्याने अर्थातच त्यांच्याभोवती वलय होतं. मुळातच त्यांचा स्वभाव मनमिळावू असल्याने दोस्त मंडळी पटकन जमा झाली. तसे ते कॉलेजातील सेलिब्रेटी होते. म्हणजे अख्या कॉलेजला माहिती होते. मुलींनाही माहिती असणार, यात शंका नाही. तसं नगर कॉलेजमध्ये पुढारलेले होतं. मुली-मुलींच्या मैत्रीला तेथे आक्षेप नव्हता. मात्र, प्रशांतभाऊ एकटे कधीच सापडायचे नाहीत. त्यांच्यासोबत नेहमी मित्रमंडळी. सांस्कृतिक कार्यक्रम, संघटन यातच ते रमायचे. त्यामुळे कोणा मुलीला भावना व्यक्त करण्याची संधी साधता आली नसावी, अशी आठवण त्यांचे मित्र गंमतीने सांगतात. त्या काळी प्रशांतभाऊ हे डिट्टो अमिताभ दिसायचे. तेवढीच हाईट, केसांची रचनाही तशीच. अलिकडेच त्यांचा बच्चन स्टाईल डान्स व्हायरल झाला होता. त्यावरील कल्पना यावी. 

 

prashanbhau 2

कॉलेज कॅन्टीनमध्ये मित्र मंडळींसोबत चहाचा आस्वाद घेताना उजव्या बाजूला अमिताभ स्टाईलमधील प्रशांत पाटील गडाख.

 

तेव्हा हिरोईन किम शर्मा कॉलेजात होती 
प्रशांतभाऊ हे संपूर्ण महाविद्यालयाला माहिती होते. स्वतःभोवती वलय असतानाही त्यांनी कधी बडेजाव केला नाही. मोहब्बते चित्रपटातील अभिनेत्री किम शर्मा आमच्या कॉलेजात होती. मात्र, आमचं तिच्याशी कधीच बोलणं झालं नाही. त्या काळात मुलींसोबत बोलायलाही भीती वाटायची. मुळात आम्ही एस.वाय.ला येईपर्यंत व्हॅलेंटाईन्स डेविषयी काहीही माहिती नव्हतं. 1992-93च्या काळात या व्हॅलेंटाईन्स डेला शिवसेनेचा विरोध असायचा. त्यांची आंदोलनं सुरू झाली किंवा पेपरमधून बातम्या आल्या तरच आम्हाला या दिवसाविषयी माहिती व्हायची. 

हेच आमचं प्रेम

कॉलेजात विविध उपक्रम राबवणे किंवा एखाद्या सामाजिक विषयावर कट्ट्यावर चर्चा घडवून आणणे यावरच आमचं प्रेम असायचं. त्या पलिकडे वेळ मिळाला तर कॅंटीनमध्ये जाऊन चहा प्यायचा किंवा तेथील कडी-वडा खायचा. या दोन पदार्थांच्या प्रेमात पडला नाही, असा त्याकाळी विद्यार्थी सापडायचा नाही. कोणाही विद्यार्थ्याला कॉलेज लाईफ आवडत असतं, तसंच माझंही आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Our Valentines are supposed to be such celebrities says Prashantbhau Gadakh