esakal | बेळगावात टीईटीत 2 लाख परीक्षार्थींपैकी फक्त 8 हजार पास 
sakal

बोलून बातमी शोधा

Out of 2 lakh candidates in TET  only 8 thousand passed

बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 6008 विद्यार्थ्यांसह राज्यातील 2 लाख डीएड व बीएड धारकांनी टीईटी परीक्षा दिली होती.

बेळगावात टीईटीत 2 लाख परीक्षार्थींपैकी फक्त 8 हजार पास 

sakal_logo
By
मिलिंद देसाई

बेळगाव : शिक्षण खात्याने शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीएटी) निकाल जाहीर केला असून राज्यातील 2 लाख विद्यार्थ्यांनी टीईटी दिली होती यापैकी फक्त 8 हजार परीक्षार्थी पास झाले आहेत. त्यामुळे टीएटी परीक्षा भावी शिक्षकांना अवघड गेल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे. तसेच 2014 पासून घेतल्या जात असलेल्या टीईटी परीक्षेचा निकाली अतिशय कमी लागला आहे. 


बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 6008 विद्यार्थ्यांसह राज्यातील 2 लाख डीएड व बीएड धारकांनी टीईटी परीक्षा दिली होती. पेपर तपासणीनंतर शनिवारी शिक्षण खात्याच्या अधिकृत संकेत स्थळावर निकाल जाहीर करण्यात आला आहे. मात्र गेल्यावर्षी प्रमाणेच यावेळीही  निकालात मोठी घसरण झाली असून टीईटी पास झालेल्या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा द्यावी लागणार आहे. परंतु निकाल कमी लागल्याने सीईटी परीक्षेनंतर पास होण्याचे प्रमाण अजून कमी होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा- सांगलीत पदवीधर निवडणुकीच्या हालचाली गतिमान


फेब्रुवारी महिन्यात टीईटी परीक्षेसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. यावेळी परीक्षार्थीनी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले होते त्यानंतर 29 मार्चला टीईटी घेण्यात येणार होती. परंतु कोरोनाच्या संकटामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती तसेच त्यानंतर दोन ते वेळा तारीख जाहीर करूनही परीक्षा घेता आली नव्हती. राज्यातील सरकारी शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा अधिक प्रमाणात रिक्त आहेत. या जागा भरती करण्यासाठी टीईटी घेण्यात येत आहे. परंतु 2014 पासून परिक्षेत पास होण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. त्यामुळे शिक्षकांच्या जागा भरती करण्याची परवानगी मिळूनही अनेक जागा रिक्त असून टीईटी परीक्षेत पास होण्याचे प्रमाण वाढले पाहिजे असे मत शिक्षण खात्यातुन व्यक्त होत आहे. 

डीएड झाल्यानंतर अनेक विद्यार्थी अभ्यासापासून दूर जातात त्यामुळेच निकालात मोठी घसरण होत आहे. यावेळी कमी लागला असून बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात किती जण पास झाले आहेत याची माहिती एक दोन दिवसात उपलब्ध होईल 
अण्णाप्पा पॅटी, शिक्षणाधिकारी

संपादन- अर्चना बनगे
 

loading image
go to top