रॉकेलमुक्तीच्या दिशेने उज्ज्वला गॅस योजनेचा परिणाम

दत्ता इंगळे
सोमवार, 2 जुलै 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला गॅस योजना सुरू केली. नगर तालुक्‍यात पूर्वी दरमहा एक लाख 20 हजार लिटर (दहा टँकर) रॉकेल लागत होते, तेथे आज फक्त 36 हजार लिटर (तीन टॅंकर) रॉकेल लागत आहे. तालुक्‍यातील कापुरवाडी, हिवरेबाजार, सोनेवाडी, पिंपळगाव लांडगा, इसळक या गावांनी ग्रामसभा घेऊन "आम्हाला रॉकेलमुक्‍त करा' असा ठराव केला आहे. उज्ज्वला गॅस योजनेमुळे रॉकेल हद्दपार होत आहे. 

भिंगार - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला गॅस योजना सुरू केली. नगर तालुक्‍यात पूर्वी दरमहा एक लाख 20 हजार लिटर (दहा टँकर) रॉकेल लागत होते, तेथे आज फक्त 36 हजार लिटर (तीन टॅंकर) रॉकेल लागत आहे. तालुक्‍यातील कापुरवाडी, हिवरेबाजार, सोनेवाडी, पिंपळगाव लांडगा, इसळक या गावांनी ग्रामसभा घेऊन "आम्हाला रॉकेलमुक्‍त करा' असा ठराव केला आहे. उज्ज्वला गॅस योजनेमुळे रॉकेल हद्दपार होत आहे. 

खनिज तेलासाठी भारतला मोठ्या प्रमाणात आयात करावी लागते. खनिज तेलावर प्रक्रिया करून रॉकेलनिर्मिती होते. शिवाय त्यापासून प्रदुषणही मोठ्या प्रमाणात होते. दारिद्रयरेषेखालील व अंत्योदय ग्राहकच रॉकेलचा वापर करीत होते. गरीब कुटुंबांसाठी मोफत गॅसजोड उपलब्ध करून देण्यासाठी केंद्राने उज्ज्वला गॅस योजना सुरू केली. त्यानंतर वर्षभरात हळूहळू रॉकेलची मागणी कमी होत आहे. तालुक्‍यातील पाच गावांनी आम्हाला रॉकेल नको असा ठराव तहसीलदारांना दिला आहे. या गावांमध्ये 973 लिटर रॉकेलपुरवठा होत होता. उज्ज्वला गॅस योजनेचा फायदा झाल्याने इतर गावांतूनही रॉकेलची मागणी घटली आहे. तालुक्‍यातील आणखी काही गावे रॉकेलमुक्तीचा ठराव जिल्हा प्रशासनाकडे पाठविणार असल्याचे समजले. 

नगर तालुक्‍यातील स्थिती 
- रेशनवर रॉकेल देणारी दुकाने - 202 
- दरमहा पूर्वी लागणारे रॉकेल (लिटरमध्ये) - 1 लाख 20 हजार 
- आता लागणारे रॉकेल (लिटरमध्ये) - 36 हजार 

उज्ज्वला गॅस योजनेमुळे रॉकेलची मागणी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्याचा परिणाम प्रदुषण नियंत्रणावरही होईल असे नगरचे जिल्हा पुरवठा अधिकारी संदीप निचित यांनी सांगितले आहे.  

Web Title: Outcome of Ujjwala Gas Scheme towards the discharge of kerosene