जिल्ह्यात 11 दिवसात तब्बल 546 रुग्णांची भर 

विष्णू मोहिते 
Friday, 24 July 2020

जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर गेल्या 121 दिवस झाले. या काळात कोरोना बांधित रुग्णांची संख्या आता ग्रामीण बरोबरच महापालिका क्षेत्रात मोठ्याप्रमाणात वाझल्याने चिंता वाटू लागली आहे.

सांगली : जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर गेल्या 121 दिवस झाले. या काळात कोरोना बांधित रुग्णांची संख्या आता ग्रामीण बरोबरच महापालिका क्षेत्रात मोठ्याप्रमाणात वाझल्याने चिंता वाटू लागली आहे. गेल्या अकरा दिवसात तब्बल 546 रुग्णांची भर पडून एकूण संख्या 1214 पर्यंत पोहोचली आहे. सध्या मृत्यूचे प्रमाण 3.45 टक्के आहे. ते दहा दिवसापूर्वी 2.68 टक्के होते. महाराष्ट्राचा कोरोना मृत्यू दर 2.40 टक्के आहे. ही जिल्ह्याच्या दृष्टीने चिंताजनक परस्थिती आहे. महापालिका हद्दीस 50 वर्षावरील नागरिकांची रॅपीड टेस्टमुळे आणखी संख्या वाढण्याची भीती आहे. पहिल्या 110 दिवसात मृत्यूचे सरासरी वय 60 पेक्षा जास्त होते. गेल्या अकरा दिवसात मात्र 50 वर्षाच्या आतील 5 रुग्णांचा मृत्यूनेही प्रशासनाची डोकेदुखी ठरते आहे. 

कोरोना काळात पहिल्या 110 दिवसाच्या काळापेक्षा गेल्या दहा दिवसात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. वाढण्याचे प्रमाण सुरवातीपेक्षा अधिक आहे. जुलै महिन्यात हे प्रमाण गतीने वाढले आहे. गेल्या 11 दिवसांत तब्बल 546 रुग्णांची वाढ झाली आहे. सरासरी दिवसाला 55 रुग्णांची भर पडली आहे. आणि चिंतेची बाब म्हणजे मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. सध्या देशाचा मृत्यूदर 2.4 टक्के आणि महाराष्ट्रातील मृत्यूचे प्रमाण 3.75 टक्के आहे. 

देशात आणि महाराष्ट्रात "अनलॉक'ची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर सांगली जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. गेल्या अकरा दिवसातील रुग्णांची वाढीचा वेग सर्वाधिक आहे. 22 जुलैअखेरची कोरोना बाधितांची एकूण आकडेवारी 1214 इतकी होती. 30 जून रोजी जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 384 होती. 12 जुलैला रुग्णसंख्या 468 होती. गेल्या अकरा दिवसात ही संख्या 1214 पर्यंत पोहोचली आहे. शिराळा तालुका "हॉटस्पॉट' कमी झाला असून सांगली, मिरज, कुपवाड महापालिका आता "हॉटस्पॉट' ठरते आहे. 

जिल्ह्यात 42 बळी..
जिल्ह्यात 42 बळी गेले आहेत. त्यातील 50 वर्षाच्या आतील पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात मिरजेतील शिवतेज चौकातील 19 वर्षाच्या व्यक्तीचा समावेश आहे. मिरजेतील 48 वर्षे, बेळंकीतील 34 वर्षे, येळापूर येथील 38 वर्षे आणि विश्रामबाग येथील 36 वर्षे व्यक्तिंचा मृत्यूने चिंतेत भर पडली आहे. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Over 546 patients in 11 days in the district