सोलापुरात न्यायासाठी एकवटला पद्मशाली समाज 

प्रमोद बोडके
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

सोलापूर : नगरमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी, हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा. या प्रकरणात दबाव टाकणाऱ्यांनाही सहआरोपी करावे या मागण्यांसाठी आज सोलापुरातील पद्मशाली ज्ञाती संस्थेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल मोर्चा काढण्यात आला. 

कन्ना चौक चौकातून निघालेला मोर्चा उद्योग बॅंक, साखर पेठ, सोमवार पेठ, विजापूर वेस, मार्कंडेय मंदिर, पंचकट्टा या मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चाला मराठा, मुस्लीम, दलित समाजाचा पाठिंबा मिळाला. सोलापुरातील पद्मशाली शिक्षण संस्थेच्या 22 शाखा आणि संभाजीराव शिंदे शाळा तसेच पूर्वभागमधील विविध शाळेतील विद्यार्थी, पालक, शिक्षकांचा या मोर्चात लक्षणीय सहभाग होता. यावेळी माजी आमदार नरसय्या आडम, पद्मशाली समाजाचे अध्यक्ष व महापालिकेचे विरोधी पक्षनेते, शिवसेना जिल्हाप्रमुख महेश कोठे, महापौर शोभा बनशेट्टी यांनी केले उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

पद्मशाली संस्थेकडून मदत 
नगरमधील पीडित मुलीच्या कुटुंबाला पद्मशाली ज्ञाती संस्थेकडून 1 लाख रुपयांची तर पद्मशाली शिक्षण संस्थेकडून 51 हजार रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. 

Web Title: padmashali community united for justice in solapur