सोलापूर: मिळकत कर ऑनलाईन भरा; सहा टक्के सवलत 

विजयकुमार सोनवणे
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

जुलैमध्ये 15 कोटींचा भरणा 
जुलै 2018 या एका महिन्यातच शहर व हद्दवाढ भागात मिळून तब्बल 15 कोटींचा भरणा झाला आहे. त्यामध्ये शहर विभागातून 9 कोटी 2 लाख 33 हजार रुपये, तर हद्दवाढ भागातून 6 कोटी 47 लाख 43 हजार रुपये भरण्यात आले आहेत. गेल्या चार महिन्यांत शहर विभागातून सुमारे 16 कोटी तर हद्दवाढ विभागात सुमारे 12 कोटी असे एकूण 28 कोटींचा भरणा झाला आहे.

सोलापूर : मिळकत कराची रक्कम ऑनलाईन भरणाऱ्यांना 31 ऑगस्ट 2018 पर्यंत करामध्ये सहा टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे.  स्मार्ट सिटी अंतर्गत करावयाच्या सुविधांतर्गत ही शिफारस करण्यात आली आहे. दरम्यान, मुख्य लेखापाल कार्यालयाने बुधवारपासून सर्व व्यवहार ऑनलाईन करण्यास सुरवात केली आहे. 

मिळकत कराची बिले वाटल्यानंतर ठराविक मुदतीत ती भरल्यास पाच टक्के सवलत दिली जाते. त्यामध्येच ऑनलाईन कर भरल्यास एक टक्का वाढीव सवलतीची शिफारस करण्यात आली आहे. लिकेचे संपूर्ण आर्थिक देवाणघेवाणीचे व्यवहार, सेवा शुल्क व इतर बाबी या ऑनलाइन पद्धतीने व डिजिटल पद्धतीने करण्यात येणार आहेत. यानुसार प्रारंभी महापालिकेतील जन्म मृत्यू दाखला व मिळकत कर विभागात ऑनलाईन पद्धतीने स्वैप मशीन द्वारे करण्यास प्रायोगिक तत्वावर प्रारंभ करण्यात आला. या दोन विभागांबरोबरच विविध विभागातील कॅश काउंटर वरून ऑनलाईन पैसे भरून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. 

महापालिकेत भरणा करण्यात येणारी रक्कम यापुढे एटीएम कार्ड किंवा क्रेडिट कार्डाच्या साह्याने बिल भरणे शक्‍य होणार आहे. त्याचे बिलही संबंधितांना दिले जाणार आहे. कोणत्याही बाबीची रक्कमही ऑनलाईन पद्धतीने दिली किंवा घेतली जाणार असून यापुढे आता कोणत्याही प्रकारचे धनादेश अथवा रोख रक्कम स्वरूपात स्वीकारली किंवा दिली जाणार नसल्याचे मुख्य लेखापाल शिरीष धनवे यांनी स्पष्ट केले आहे. डिजीटल पेमेंट सुरु झाल्यामुळे नागरिकांचा वेळ वाचणार आहे. तसेच बनावट नोटा जमा होण्याचा प्रश्‍नच राहणार नाही. पालिकेतील विविध कार्यालयात या पॉश मशिन बसविण्यात आल्या आहेत. ऑनलाईन प्रक्रियेबाबत कोणतेही लेखी आदेश न आल्याने कर संकलन विभागात धनादेश स्वीकारले जात आहेत. लेखी आदेश आल्यानंतर धनादेश स्वीकारणे बंद करण्यात येईल, असे कर संकलन प्रमुख आर. पी. गायकवाड यांनी सांगितले. 

जुलैमध्ये 15 कोटींचा भरणा 
जुलै 2018 या एका महिन्यातच शहर व हद्दवाढ भागात मिळून तब्बल 15 कोटींचा भरणा झाला आहे. त्यामध्ये शहर विभागातून 9 कोटी 2 लाख 33 हजार रुपये, तर हद्दवाढ भागातून 6 कोटी 47 लाख 43 हजार रुपये भरण्यात आले आहेत. गेल्या चार महिन्यांत शहर विभागातून सुमारे 16 कोटी तर हद्दवाढ विभागात सुमारे 12 कोटी असे एकूण 28 कोटींचा भरणा झाला आहे.

Web Title: paid online property tax and get discount in Solapur