तीनशे पेक्षा जास्त पोती उचलणाऱ्या हमालाची व्यथा; व्हिडिओ व्हायरल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

तीनशे पेक्षा जास्त पोती उचलणाऱ्या एका हमलाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. कराड तालुका खरेदी विक्री संघातील हमलाने आपली व्यथा या व्हिडिओत मांडली आहे. 

कराड : तीनशे पेक्षा जास्त पोती उचलणाऱ्या एका हमलाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. कराड तालुका खरेदी विक्री संघातील हमलाने आपली व्यथा या व्हिडिओत मांडली आहे. 

हमाल्याच्या म्हणण्यानुसार गाडीची जी हमाली झाली आहे त्यापेक्षा त्याला 450रुपये कमी देण्यात आले आहेत. जो सध्याच्या परिस्थितीत दोन लोकांचा दिवसभराचा रोजगार आहे. या हमालाने 333 पोती उतरल्यावर नियमानुसार 450 रुपये कमी देण्यात आले आहेत. काम करायचे नसेल तर करु नको अशी धमकीही त्याच्या साहेबांकडून मिळत असल्याचे त्याने म्हटले आहे.

 

गेल्या 20 वर्षापासून हा हमाल कराड तालुका खरेदी विक्री संघात हमाली करत असल्याचेही त्याने सांगितले आहे. मग कुठल्याही जीवनावश्यक वस्तूचे दर कमी होत नसताना आम्ही पैसे का कमी घ्यायचे असा प्रश्न या हमालाने उपस्थित केला असून सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pain of porter in satara vedio viral