‘पालिका आपल्या दारी’ची स्थायीच्या सभेवर छाप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

सातारा - ‘पालिका आपल्या दारी’ या उपक्रमांत नागरिकांनी मांडलेल्या दीर्घकालीन समस्यांवर उपाययोजना करण्यावर नगराध्यक्षा माधवी कदम यांनी भर दिल्याचे स्थायी समितीच्या सभेतील विषयांवर नजर टाकल्यावर दिसून येते आहे. 

सातारा - ‘पालिका आपल्या दारी’ या उपक्रमांत नागरिकांनी मांडलेल्या दीर्घकालीन समस्यांवर उपाययोजना करण्यावर नगराध्यक्षा माधवी कदम यांनी भर दिल्याचे स्थायी समितीच्या सभेतील विषयांवर नजर टाकल्यावर दिसून येते आहे. 

मंगळवारी (ता. १८) सकाळी ११ वाजता होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेत बहुतांश विषय हे विविध प्रभागांतील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, गटारांवर लॉप्ट बसविणे, विविध समाजमंदिरांची दुरुस्तीची कामे आहेत. या व्यतिरिक्त कास धरण तसेच बंगला परिसरामध्ये देखभाल व सुरक्षिततेसाठी नेमण्यात येणाऱ्या खासगी कर्मचारी नियुक्तीसाठी दोन लाख ६३ हजार ५२० रुपये, कास पंपिंग स्टेशनसाठी दोन लाख ९४ हजार ९०० रुपयांच्या खर्चाचा विषय सभेपुढे घेण्यात आला आहे. रस्त्यांचे अंतर्गत डांबरीकरण, शाहू कलामंदिर या नाट्यगृहातील दरवाजे, पडदे, व्यासपीठानजीकचा काळा पडदा नवीन तयार करणे तसेच मेकअप खोलीचे तसेच शौचालयांची दुरुस्ती करणे, राजवाडा उंच साठवण टाकीस माजी उपनगराध्यक्ष (कै.) संजय जोशी जलकुंभाचे नामकरण, आरोग्य विभागाच्या जेसीबी वाहनांकरिता दोन ऑपरेटर कंत्राटी पद्धतीने घेणे असे विषय मंजुरीसाठी घेण्यात आले आहेत. याबरोबरच करंजे, सोमवार पेठेतील पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी नवीन जलवाहिनी टाकणे, गळती काढणे या कामासाठी दोन लाख ६३ हजार ५२० रुपये, कास धरण तसेच बंगला परिसरामध्ये देखभाल व सुरक्षिततेसाठी नेमण्यात येणाऱ्या खासगी कर्मचारी नियुक्तीसाठी दोन लाख ६३ हजार ५२० रुपये, कास पंपिंग स्टेशनसाठी दोन लाख ९४ हजार ९०० रुपयांचा खर्चाचे विषय सभेपुढे मंजुरीसाठी घेण्यात आले आहेत.

फुटका तलावावर चेंजिंग रूम! 
फुटका तलाव येथे दररोज पोहण्यासाठी नागरिक येत असतात. त्यामध्ये उन्हाळ्यात लहान मुलांचा समावेश असतो. हा पालिकेचा अधिकृत असा जलतरण तलाव नाही. नवशिक्‍यांसाठी येथे जीवरक्षकदेखील नाहीत. तरीही पालिकेने या ठिकाणी मुलींना कपडे बदलण्यासाठी लहान शेड उभारणे व इतर दुरुस्ती असा विषय सभेपुढे मंजुरीसाठी आणला आहे.

Web Title: Palika Aapalya Dari Standing Committee Municipal