पलूस, मिरज, वाळवा, शिराळा तालुक्यातील शाळांना शुक्रवारी सुट्टी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

पुरस्थितीमुळे पलूस, मिरज, वाळवा, शिराळा या तालुक्यातील रस्ते व पूल पाण्याखाली गेलेले आहेत. यासाठी या तालुक्यातील शाळा व महाविद्यालयांना शुक्रवारी (ता.9) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.

 

सांगली - जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे कोयना व वारणा धरणामधून पाण्याचा विसर्ग होत आहे. यामुळे नद्यांच्या पाणी पातळ्यात वाढ झाली आहे. कृष्णा नदीची पाणी पातळी 57 फुटावर पोहोचली आहे. पुरस्थितीमुळे पलूस, मिरज, वाळवा, शिराळा या तालुक्यातील रस्ते व पूल पाण्याखाली गेलेले आहेत. यासाठी या तालुक्यातील शाळा व महाविद्यालयांना शुक्रवारी (ता.9) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.

अतिवृष्टीमुळे जिल्हयात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असल्याने त्याचा परिणाम शालेय विदयार्थींवर होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Palsu, Miraj, Walava, Shirala taluka School close on Friday