पलूसला दरवर्षी दीड कोटी तोटा

संजय गणेशकर
शुक्रवार, 15 जून 2018

पलूस - बसस्थानक महामंडळाच्या गुणानुक्रमांकामध्ये राज्यात अव्वल स्थानावर आहे. तरीही ग्रामीण भागातील बसफेऱ्या आणि खासगी प्रवासी वाहतूक, वेळेत बस गाड्या नसणे यामुळे पलूस आगारही गेल्या आर्थिक वर्षात १ कोटी ५६ लाख ९४ हजार रुपये तोट्यात आहे.

माजी मंत्री स्व. आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रयत्नातून ५ डिसेंबर २०१३ रोजी पलूसला स्वतंत्र आगार सुरू झाले. तालुक्‍यात ३५ गावे आहेत. येथून ग्रामीण भागात एकूण १७७ फेऱ्या बसेसच्या होतात.

मात्र, प्रवाशांच्या वेळेत बसेस नसणे, वाढलेली खासगी प्रवाशी वाहतूक यामुळे महामंडळाला अपेक्षित उत्पन्न ग्रामीण फेऱ्यातून मिळत नाही.
सध्या नवीन बसस्थानकामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय आहे. स्वच्छतागृह आहे. 

हे करायला हवे
बसस्थानका अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती
बसस्थानकामध्ये रात्रीच्यावेळी वीजीचे सोय.
बसस्थानकामध्ये विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन पोलीस बंदोबस्ताची गरज.
वेळेत बससेवा सुरु करणे.

प्रवाशांनी महामंडळाने दिलेल्या सुविधांचा वापर व्यवस्थित करावा. खासगी प्रवाशी वाहतुकी ऐवजी प्रवाशांनी एस. टी. नेच सुरक्षीत प्रवास करावा. दिपावली पासून पलूस येथून शिवशाही बसेसची सोय होईल. खासगी प्रवाशी वाहतूक, ग्रामीण भागातील फेऱ्या व वाढलेले डिझेलचे दर यामुळे एस. टी. तोट्यात आहे. 
- ए. एन. पाटील, आगार व्यवस्थापक पलूस

दृष्टिक्षेपात
 एकूण बस - ४१
 चालक ७७ (गरज अजून ६)
 वाहक ७६ (गरज अजून ६)
 प्रशासन व कार्यशाळा कर्मचारी ६२
 दररोजच्या फेऱ्या लांब पल्ला २२
 ग्रामीण फेऱ्या १७७
 दररोजचे किलोमीटर १३ हजार ६०० कि.मी.
 दररोजचे उत्पन्न ३ लाख ५० हजार
 मासिक उत्पन्न - १ कोटी 

( उद्याच्या अंकात आटपाडी बसस्थानक ) 

Web Title: palus bus depo 1.5 crore rupees loss