पलूसला विषय समिती सभापती निवडी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

सुहास पुदाले यांना बांधकाम, शिंदेंकडे पाणीपुरवठा समिती 

पलूस - पलूस नगरपालिका विशेष सभेत विविध विषय समित्यांच्या सभापतिपदी सुहास पुदाले, परशराम शिंदे, विक्रम पाटील, सुनीता कांबळे, रेखा भोरे यांची तर उपसभापतिपदी उज्ज्वला मोरे यांची बिनविरोध निवड झाली. 

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार मधुसूदन बर्गे तर पिठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष राजाराम सदामते यांनी काम पहिले या वेळी मुख्याधिकारी महेश रोकडे उपस्थित होते. 

पहिल्याच नगरपालिका निवडणुकीत आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने नगराध्यक्षपदासह १७ पैकी १३ जागांवर विजय मिळवला. उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्य निवडीनंतर सर्वांचे लक्ष विषय समिती सभापती निवडीकडे लागले होते.

सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या बांधकाम व नियोजन समितीच्या सभापतिपदी काँग्रेसचे पक्षप्रतोद सुहास पुदाले यांची तर पलूसमध्ये संवेदनशील असणाऱ्या पाणीपुरवठा विभाग समितीच्या सभापतिपदी परशराम शिंदे यांची निवड झाली. उपनगराध्यक्ष विक्रम पाटील यांच्याकडे आरोग्य व पर्यावरण समितीचे सभापतिपद देण्यात आले. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी रेखा भोरे व उपसभापतिपदी उज्ज्वला मोरे यांची तसेच शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक विभाग समितीच्या सभापतिपदी सुनीता कांबळे यांची निवड झाली. 

पलूस मध्ये रस्ते पाणी वीज स्वछता हे महत्त्वाचे प्रश्न आहेत नगराध्यक्ष सह सभापती नगरसेवक यांच्याकडून जनतेच्या खूप अपेक्षा आहेत. निवडीनंतर नगरपालिकेचा कारभार अधिक वेगाने होईल, अशी अपेक्षा आहे. 

या निवडीच्या वेळी वैभव पुदाले, गिरीश गोंदिल, नगसेवक विशाल दळवी, अभिजित गोंदिल, नितीन जाधव, संदीप सिसाळ, प्रतिभा डाके, स्वाती गोंदिल. अंजली मोरे, श्रीमती सुरेखा माळी उपस्थित होत्या.

Web Title: Palus committee chairperson choice of subject