K-OK palus sangli news dr shripal sabnis talking साहित्यात ग्रामीण वास्तवाचे चित्रण गरजेचे - डॉ. श्रीपाल सबनीस | eSakal

साहित्यात ग्रामीण वास्तवाचे चित्रण गरजेचे - डॉ. श्रीपाल सबनीस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 डिसेंबर 2017

पलूस - साहित्य शब्दांची आतिषबाजी नव्हे. ती उपासना आहे. साहित्यात ग्रामीण भागातील वास्तवाचे चिंत्रण होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. येथे स्वामी विवेकानंद ग्रामविकास मंडळ व पलूस तालुका मराठी साहित्य परिषदेच्या वतीने 29वे ग्रामीण साहित्य संमेलन झाले. अध्यक्षस्थानावरून डॉ. सबनीस बोलत होते. चंद्रकांत शहासने (पुणे) प्रमुख पाहुणे होते.

श्री. शहासने म्हणाले, ""ग्रामीण भागात साहित्याची ऊर्जाकेंद्रे आहेत. ती शोधली पाहिजेत. मावळतीच्या प्रकाशात उगवतीची किरणे शोधायची असतात.''

दत्ता मानुगडे, डॉ. अशोक माळी, प्रा. रघुराज मेटकरी, सुनील तोरणे, विजयकुमार कुलकर्णी, वृषाली कुलकर्णी, सर्जेराव नलवडे, आर. पी. सावंत यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रा. शिवाजी वरुडे व हरिभाऊ पुदाले यांच्या पुस्तकांचे प्रकाशन झाले.

प्रा. संतोष काळे यांनी स्वागत केले. वासंती मेरू यांनी प्रास्ताविक केले. बी. ए. पाटील, विष्णू सिसाळ यांनी मनोगत व्यक्त केले.

सुहास पुदाले, पांडुरंग पुदाले, अधिकराव मोरे, शामराव डाके, वसंत आपटे, सतीश पवार, सोपान डोंगरे, उमा पुदाले व मंडळाचे कार्यकर्ते, साहित्यिक उपस्थित होते. संतोष काळे व सायली मेरू यांनी सूत्रसंचाललन केले. डॉ. संपत पार्लेकर यांनी आभार मानले.

पलूस - येथे स्वामी विवेकानंद ग्रामविकास मंडळ व पलूस तालुका मराठी साहित्य परिषदेच्या वतीने 29वे ग्रामीण साहित्य संमेलन झाले. त्या वेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस. शेजारी अन्य मान्यवर.

Web Title: palus sangli news dr shripal sabnis talking