पॅनकार्ड नसलेल्यांची माहिती मागवली 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - चालू आर्थिक वर्षात 1 एप्रिलपासून खात्यावर 10 ते 50 हजार रुपये रक्कम भरलेल्या; पण पॅनकार्ड नसलेल्या खातेदारांची माहिती रिझर्व्ह बॅंकेने बॅंकांकडून मागितली आहे. काही मोठे उद्योजक, शिक्षणसम्राट व लाचखोर व्यक्तींनी कोट्यवधी रुपयांची मिळवलेली रक्कम आपले कर्मचारी, सहकारी व नातेवाईक यांच्या खात्यावर भरण्यास सुरवात केली आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर अशा कर्मचाऱ्यांकडे एवढे पैसे आले कोठून, याची चौकशी होण्याची शक्‍यता आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबरला 500 व 1000 च्या चलनी नोटा रद्द केल्या. या निर्णय जाहीर करताना एका व्यक्तीला दोन लाख 50 हजारपेक्षा कमी रक्कम बॅंकेत कोणत्याही अटीशिवाय त्यांच्या खात्यात भरता येईल, असे जाहीर केले होते. महिलाही आपल्याजवळील रक्कम त्यांच्या खात्यात भरू शकतात. त्यामुळे काहींनी आपल्याकडील अतिरिक्त रक्कम पत्नी, मुलीच्या नावे जमा केली आहे. काही जणांनी तसे नियोजन केले आहे. ही रक्कम भरताना सुरवातील पॅनकार्ड सक्तीची अट नव्हती. 

काल (ता. 16) रिझर्व्ह बॅंकेने 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम खात्यावर भरणाऱ्यांकडून पॅनकार्ड स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत. तसा हा आदेश जुनाच आहे; पण ग्रामीण भागातीलच नव्हे तर शहरी भागातही अनेक महिलांची पॅनकार्ड नाहीत. त्यामुळे कालपर्यंत पॅनकार्ड नसले तरी 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम काही महिलांच्या खात्यावर जमा झाली. आता ही रक्कम त्यांच्याकडून आली कोठून याची चौकशी होण्याची भीती व्यक्त होत आहे. 

आज तर रिझर्व्ह बॅंकेने सर्व नागरी बॅंका, राज्य बॅंका, राष्ट्रीयीकृत व खासगी बॅंकांकडून 1 एप्रिल 2016 पासून ज्यांच्या खात्यावर दहा हजार ते 50 हजार किंवा त्यापेक्षा जादा रक्कम जमा झाली आहे, त्यांची माहिती मागवली आहे. तातडीने ही माहिती द्यावी, असे या परिपत्रकात म्हटले आहे. जुन्या नोटांवरील बंदीनंतर काही अवैध व्यावसायिकांबरोबरच ज्यांच्याकडे भरमसाट पैसा आहे अशा लोकांनी त्यांचे कामगार, हितचिंतक व नातेवाईक यांच्या नावे 2 लाख ते 2 लाख 40 हजारपर्यंतची रक्कम जमा केली आहे. ही रक्कम भरताना संबंधितांकडे पॅनकार्ड मागितले नव्हते. आता मात्र पॅनकार्ड नसलेल्या अशा व्यक्तींची माहिती रिझर्व्ह बॅंकेने मागवली आहे. 

पैसे भरण्यात येणार अडचण 

ग्रामीण भागातील महिलांच्या खात्यावर दुधाचे बिल जमा होते. अनेक महिलांच्या खात्यावर साखर कारखान्यांकडून उसाची बिलेही जमा होतात. ही रक्कम मोठी असते; पण पॅनकार्ड हा शब्दच अनेक ग्रामीण महिलांना माहीत नाही. त्यांची यापुढची रक्कम पॅनकार्डशिवाय एकतर मिळणार नाहीच. यापुढे पैसेही त्यांच्या खात्यावर भरणे अडचणीचे ठरणार आहे. 

Web Title: PAN information sought is non