कोरेगाव, खटाव, महाबळेश्‍वर खुले 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

सातारा - जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापतिपदांसाठी आज झालेल्या आरक्षण सोडतीत कोरेगाव, खटाव, महाबळेश्‍वर समित्यांचे सभापतिपद खुले झाले. त्यामुळे मातब्बरांनाही सभापतिपदाची संधी असल्याने तेथील चुरस वाढणार आहे. 11 पैकी पाच समित्यांवर पुढील अडीच वर्षांसाठी महिलाराज येणार आहे. 

सातारा - जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापतिपदांसाठी आज झालेल्या आरक्षण सोडतीत कोरेगाव, खटाव, महाबळेश्‍वर समित्यांचे सभापतिपद खुले झाले. त्यामुळे मातब्बरांनाही सभापतिपदाची संधी असल्याने तेथील चुरस वाढणार आहे. 11 पैकी पाच समित्यांवर पुढील अडीच वर्षांसाठी महिलाराज येणार आहे. 

जिल्हाधिकारी आश्‍विन मुद्‌गल, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात दुपारी दीड वाजता चक्राकार पद्धतीने आरक्षण सोडत घेण्यात आली. "पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन'द्वारे प्रथमच आरक्षण सोडतीची माहिती देण्यात आली. 2002 पासून पडलेले आरक्षण तपासण्यात येऊन त्यानुसार आरक्षण सोडत होणार असल्याचे श्री. मुद्‌गल यांनी सांगितले. 

कोरेगाव, खटाव, महाबळेश्‍वर येथील सभापतिपदे खुले झाल्याने तेथे इच्छुकांची संख्या वाढणार असून, चुरसही वाढेल. फलटण, पाटण, वाई, जावळी येथे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षण असल्याने तेथे "महिलाराज' येणार आहे. सातारा, खंडाळा येथे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षण आले आहे, तर कऱ्हाड येथे नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षण पडले आहे. माणला अनुसूचित जातीसाठी आरक्षण जाहीर झाले. 

जिल्हाधिकाऱ्यांनी फिरविला "ड्रम' 

आरक्षण सोडतीचा "ड्रम' जिल्हाधिकारी श्री. मुद्‌गल यांनी आज स्वत:च फिरविला. त्या वेळी दोन शालेय विद्यार्थ्यांकडून आरक्षणानुसार चिठ्ठ्या उचलण्यात आल्या. सभापतिपदांची आरक्षण सोडत असतानाही राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती अतिशय तुटपुंजी होती. काही कार्यकर्ते, तर आरक्षण सोडत संपल्यावर येत होते. 

असे पडले आरक्षण 

कोरेगाव, खटाव, महाबळेश्‍वर ः खुले 
फलटण, पाटण, वाई, जावळी ः सर्वसाधारण महिला 
सातारा, खंडाळा ः नागरिकांचा मागास प्रवर्ग 
कऱ्हाड ः नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) 
माण ः अनुसूचित जाती प्रवर्ग 

Web Title: panchayat samittee president