हरित लवादाने केली महापालिकेची कानउघाडणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

कोल्हापूर - पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी उपाययोजना करण्यात महापालिका जाणीपूर्वक टाळाटाळ करीत असल्याचा ठपका हरित लवादाने आज ठेवला. सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे काम पूर्ण करण्यास विलंब होत असल्याचे सांगत महापालिकेला दंड का करू नये, अशी विचारणा लवादाने केली.

पुण्यात पाच-सहा महिन्यांपासून लवादाचे काम बंद होते. नव्याने कामास सुरवात झाली आहे. एस. पी. वंगडी, नागिन नंदा यांच्या लवादासमोर सुनावणी झाली. पंचगंगा प्रदूषण रोखण्याच्या कामी दुधाळी सांडपाणी प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. सहा एमएलडीची सांडपाणी प्रक्रिया केंद्राची वर्क ऑर्डर प्रस्तावित आहे. 

पालिकेतर्फे ॲड. गुप्ते यांनी बाजू मांडली. याचिकाकर्ते सुनील केंबळकर, आर. के. पाटील उपस्थित होते.

महापालिकेवर पूर्वीच दंडात्मक कारवाई व्हायला हवी होती, असे मत लवादाने मांडले. पालिकेतर्फे खुलासा करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, लवादाचे समाधान झाले नाही. अखेर अमृत योजनेसह येत्या दोन दिवसात कृती आराखडा सादर करावा, असे आदेश लवादाने दिले.

पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी काल (ता. २) महापालिका आयुक्तांसह इचलकरंजी नगराध्यक्षांवर ताशेरे ओढले. आज हरित लवादाच्या रोषास महापालिका प्रशासनाला सामोरे जावे लागले.

उपाययोजनांना विलंब
लवादाने विलंबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. लवाद नवा असला, तरी तीन-चार वर्षांपासून चाललेल्या कामकाजाची माहिती आपणास आहे. प्रदूषण रोखण्यासंबंधीच्या उपाययोजना ज्या गतीने व्हायला हव्या होत्या, त्या गतीने त्या झालेल्या नाहीत. या कामातील विलंब संतापजनक आहे. दुधाळी सांडपाणी प्रक्रिया केंद्र पूर्वीच सुरू होणे अपेक्षित होते. सहा एमएलडीच्या प्रकल्पाला अद्याप सुरवात झालेली नाही.

Web Title: panchganga pollution Green Arbitration municipal