पांचगणी स्वच्छतेचा पॅटर्न महाराष्ट्राला दिशादर्शक आणि सुरक्षित पर्यटन : आ. निलम गोऱ्हे 

रविकांत बेलोशे
शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018

पांचगणी (ता. महाबळेश्वर) पालिकेच्या स्वच्छ भारत पॉईंटला भेट दिल्यानंतर पालिका सभागृहात आयोजित केलेल्या बैठकीत मार्गदर्शन करताना आ. डॉ गोऱ्हे बोलत होत्या.

भिलार : पांचगणी नगरपालिकेने स्वच्छतेत देशात अव्वल येण्याचे केलेले काम कौतुस्कस्पद असेच आहे. स्वच्छतेला महत्व देत उभारलेल्या 'स्वच्छ भारत पॉइंटची' मला विधानपरिषद सभापती कडून माहिती मिळाली. त्यामुळे मला तो औत्सुक्याचा विषय होता. आज स्वच्छ भारत पॉईंट पाहिला आणि समाधान वाटले खरोखरीच पांचगनिकरांचा स्वच्छतेचा पॅटर्न इतरांना मार्गदर्शक ठरणारा असल्याचे गौरवोद्गार विधान परिषद विशेषाधिकार समितीच्या अध्यक्षा आमदार डॉ नीलमगोऱ्हे यांनी काढले. 

पांचगणी (ता. महाबळेश्वर) पालिकेच्या स्वच्छ भारत पॉईंटला भेट दिल्यानंतर पालिका सभागृहात आयोजित केलेल्या बैठकीत मार्गदर्शन करताना आ. डॉ गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी समितीचे सदस्य आमदार रामराव वडकुते, विधान मंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, महाबळेश्वरच्या नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे, पांचगणीच्या उपनगराध्यक्षा सुलभा लोखंडे, सभापती रुपाली राजपूरे, तहसीलदार मीनल कळसकर, जिल्हा परिषद सदस्या नीता आखाडे, प्रनीती जंगम आदी मान्यवर उपस्थित होते.

Panchgani

महाबळेश्वर तालुक्यात पदाधिकारी व प्रशासनात महिलांची संख्या जास्त आहे याचा अभिमान वाटतो असे सांगून डॉ गोऱ्हे पुढे म्हणाल्या महिला पदाधिकारी झाल्यावर त्यांना त्यांचे हक्क, कायदे याची माहिती नसते काही काही कार्यक्रमात त्यांना हक्कांची जाणीव नसल्याने कुठंतरी कोपऱ्यात स्थान दिले जात. निवडून आल्यावर काय करायला पाहिजे, बैठकी आगोदर तयारी करायला हवी, प्रश्न मांडण्यासाठीची हातोटी आणि अभ्यासाची कमतरता भासते, विकासकामाच्या पाठपुराव्यासाठी प्रवास आणी अनुभवाची कमतरता जाणवते यासाठी या महिला प्रतिनिधींसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावे असेही डॉ गोऱ्हे यांनी सांगितले.
स्वित्झर्लंडमध्ये भारतातील यश चोपडा यांचा पुतळा उभारला भारतीय पर्यटकाना आकर्षणासाठी पण जगात सुरक्षित भारतात नाही असं तिथं म्हंटल जात. जागतिक पातळीवर होणाऱ्या चर्चेतून महाराष्ट्रात पर्यटन सुरक्षित नसल्याचे डॉ. निलम गोऱ्हे यांनी सांगीतलेवर महाबळेश्वरचे नगरसेवक रवींद्र कुंभारदरे यांनी पांचगणी व महाबळेश्वर हि खरेतर सुरक्षित पर्यटनस्थळे आहेत याचा शासनदरबाताच्यावतीने ज्या पद्धतीने प्रचार व प्रसार व इंटरनॅशनल लेव्हलवर सकारात्मकतेने मांडलं जात नाही आणि केंद्र व महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधीनि प्रखरतेंन यावर पावलं उचलली नाहीत त्यामुळे महाराष्ट्रात परदेशी पर्यटनाची संख्या रोडावली असल्याचे सांगितले. यावर आपणाकडून प्रयत्न होणार का ? असा प्रश्न उपस्थित केला.
यावर निलमताई गोऱ्हे यांनी सांगितले चिंनचे पर्यटक भारतात पर्यटनासाठी येण्यास इच्छुक आहेत. या परदेशी पर्यटकांच्या प्रश्नावर आपण सभागृहात चर्चा घेऊ परंतु शासनावर अवलंबून न राहता पांचगणी व महाबळेश्वर येथील प्रशासन व व्यावसायिकांनी आपली स्वतंत्र वेबसाईड काढून जनजागृती केल्यास अधिक फायदेशीर ठरणार आहे.

पांचगणीच्या स्वच्छ पॉइंटची व पांचगणीच्या स्वच्छतेची फक्त माहिती ऐकून होते परंतु आज प्रत्यक्ष पाहिल्यावर मात्र समाधान वाटल्याचे सांगून नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर, अमिता दगडे पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. 

जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी प्रास्ताविकात विविध विषयांचा आढावा घेतला. तसेच पांचगणीच्या मुख्याधिकारी अमिता दगडे -पाटील यांनी पांचगणीच्या नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर, उपनगराध्यक्षा, मुख्याधिकारी , बहुतांश नगरसेविका या महिला आहेत. अगदी स्वच्छतेच्या कामात स्वच्छाग्रही ह्या शहराच्या त्या त्या प्रभागातील महिला बचत गटाच्या सदस्य आहेत .त्या प्रभागात महिलांकडून ओला व सुका कचरा वेगवेगळा करतात जा याचेवर बारीक लक्ष ठेवून असतात हे आवर्जून सांगितले.
यावेळी पांचगणी,  महाबळेश्वरचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.  
उपनगराध्यक्षा सुलभा लोखंडे, प्रवीण बोधे, उज्वला महाडिक, अर्पणा कासुर्डे, सुमन गोळे, आशा बगाडे यांनी उपस्थिताचे स्वागत केले. सूत्रसंचालन अमिता दगडे पाटील यांनी केले तर आभार सुलभा लोखंडे यांनी मानले.
सोबत फोटो आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Panchgun Cleanliness Pattern Guides for Safe Tourism to Maharashtra says mla Neelam Gorhe