कऱ्हाड तालुक्‍याचा ‘किंगमेकर’ आज ठरणार

- हेमंत पवार
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

पंचायत समितीच्या सत्तेसाठी होणार फैसला; अनेक नेत्यांचीही प्रतिष्ठा लागली पणाला

कऱ्हाड - जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी ७३.२१ टक्के मतदान झाले. जास्तीतजास्त उमेदवार निवडून यावे, यासाठी सर्वच नेत्यांनी जोरदार प्रयत्न केले. तालुक्‍यातील १२ गट आणि २४ गणांतील १६५ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. उद्या (गुरुवारी) मतमोजणी होणार आहे. निकालातून कऱ्हाड तालुक्‍याच्या पंचायत समितीचा ‘किंगमेकर’ ठरणार आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या सत्तेचाही फैसला उद्या होणार असल्याने नेत्यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. 

दोन विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षेत्र असणारी कऱ्हाड तालुक्‍याची पंचायत समिती ही राज्यातील मोठी पंचायत समिती आहे. या पंचायत समितीवर सत्ता मिळवण्यासाठी नेहमीच चुरस असते. यापूर्वी या पंचायत समितीवर काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. सध्या मात्र या पंचायत समितीच्या सभापतिपदावर भाजपनेही दावा केला आहे. या वेळच्या निवडणुकीत कधी नव्हे एवढी चुरस पाहायला मिळाली. उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, आमदार बाळासाहेब पाटील, आनंदराव पाटील, जयकुमार गोरे, माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर, भाजपचे चिटणीस अतुल भोसले, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्‍वजित कदम, ज्येष्ठ नेते भीमरावदादा पाटील, मदनराव मोहिते, राजेश पाटील-वाठारकर यांच्यासह अन्य नेत्यांच्या जाहीर सभा झाल्या. आपल्याच गटाची सत्ता पंचायत समितीवर येण्यासाठीही नेत्यांनीही मोठे प्रयत्न केले. त्यामुळे या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाल्याने मतदानाची टक्केवारी या वेळी वाढली. जेथे खुल्या गटातील जागा आहेत तेथे तर चुरशीने मतदान झाल्याने कोण निवडून येईल, हेही सांगता येणे मुश्‍कील बनले आहे, तरीही पक्षाच्या उमेदवार, अपक्षांसह कार्यर्त्यांनीही मतांची बेरीज करून उद्याच्या निकालाचा ठोकताळा तयार केला आहे. त्यामुळे आता निकाल काय लागणार? याचीच सर्वांनी उत्सुकता लागून आहे. उद्याच्या निकालातून कऱ्हाड तालुक्‍याच्या पंचायत समितीचा ‘किंगमेकर’ कोण होणार याकडे तालुक्‍याचे लक्ष लागले आहे. तेथील सत्तेचाच फैसला निकालातून होणार असल्याने आता तालुक्‍यातील नेत्यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

खात्रीचे उमेदवारही गॅसवर 
तालुक्‍यातील १२ गटापैकी मसूर, कोपर्डे हवेली, तांबवे, विंग आणि येळगाव हे गट तर पाल, कोपर्डे हवेली, हजारमाची, वारुंजी, कोळे, शेरे हे गण खुले होते. तेथे मोठ्या चुरशीने मतदान झाले आहे. त्यामुळे तेथील बहुतांश उमेदवारांनी शर्थीचे प्रयत्न करून स्वतःच्या विजयासाठी प्रयत्न केले. त्यामुळे त्यातील अनेकांना विजयाची खात्री असल्याने उद्याच्या निकाल काय लागणार? या चिंतेने अनेक उमेदवार सध्या गॅसवर आहेत.

Web Title: panchyat committee election result