हुतात्मा जवानांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी विठ्ठल धावला

Pandharpur
Pandharpur

पंढरपूर : देशाच्या रक्षणासाठी प्राणाची बाजी लावलेल्या हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी वीस लाखाची मदत श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी दिली.

जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन जवान हुतात्मा झाले आहेत. या हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख रुपये अशी एकूण वीस लाखाची मदत केली जाणार आहे.

पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 42 भारतीय जवान हुतात्मा झाले. या दुःखद घटनेमुळे सर्व देश हळहळला असून देशभरात शोककळा पसरली होती. या हल्ल्यात देशासाठी प्राणाची बाजी लावणारे लढाऊ सैनिक आपण गमावले असून त्यामध्ये महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील नितीन शिवाजी राठोड आणि संजय सिंह राजपूत यांचा समावेश आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी आणि महाराष्ट्रातील सर्व विठ्ठलभक्त वारकरी सहभागी असून या हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना मानवतावादी भूमिकेतून व सामाजिक उत्तरदायित्व म्हणून मंदिर समिती मार्फत प्रत्येकी दहा लाख रुपये अशी एकूण वीस लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाच्या निर्देशानुसार हा निधी मंदिर समिती मार्फत शहिदांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केला जाणार असल्याचे डॉक्टर अतुल भोसले यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com