पंढरपूर : विठुमाऊलीच्या गाभाऱ्याला 'ब्ल्यू डायमंड'चा साज! (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑक्टोबर 2019

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिरात दिव्यांची रोषणाई ही करण्यात आली आहे. आज पाडव्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच 'ब्ल्यू डायमंड' या विदेशी पाना-फुलांची आरास करण्यात आली आहे.

पंढरपूर : दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने आज विठ्ठल-रूक्मिणीचा गाभारा 'ब्ल्यू डायमंड' या आकर्षक आणि मनमोहक फुलांनी सजविण्यात आला आहे.

- का साजरी केली जाते बलिप्रतिपदा? कोठे कसा साजरा होतो पाडवा?

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिरात दिव्यांची रोषणाई ही करण्यात आली आहे. आज पाडव्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच 'ब्ल्यू डायमंड' या विदेशी पाना-फुलांची आरास करण्यात आली आहे.

- या ओवाळणीपुढे दुसरी ओवाळणीही फिकी

या फुलांनी देवाचा गाभारा आणि प्रवेशद्वार ही  सजवण्यात आला आहे. पाडव्याच्या निमित्ताने देवाला विविध पारंपारिक दागिणे ही परिधान करण्यात आल्याने देवाचे रूप अधिकच खुलून दिसत आहे. सावळया विठुरायाचे गोजिरवाणे रूप पाहण्यासाठी भाविकांनी पहाटे पासूनच मंदिरात गर्दी केली आहे.

- 'युती'च्या मनोमिलनानंतर ठरणार आघाडीची रणनीती

पाडव्यानिमित्त विठुमाऊलीचे दर्शन घेण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातूनच नव्हे, तर राज्यभरातील विठ्ठल भक्त पंढरीत येत असतात. यामुळे देवस्थान ट्रस्टतर्फे पंढरी सजविण्यात आली आहे. मंदिराला रोषणाई करण्यात आली असून चंद्रभागेच्या घाटावर सायंकाळी दिव्यांची रोषणाईही करण्यात येते. दर्शन घेतल्यानंतर विठुमाऊलीचे हे रुप डोळ्यात साठवित भक्तगण घरी परततात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pandharpur Lord Vitthal Temple decorated with Blue Diamond flowers for Diwali Padwa Festival