पंढरपुर-मंगलवेढ्यात स्वप्न विधानसभा आमदारकीचे

download.jpg
download.jpg

ब्रह्मपुरी (सोलापुर) : पुढील वर्षी 2019 च्या होणाऱ्या पंढरपुर-मंगलवेढा विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षानी चंग बांधला असून निवडणुकीचे वारे आतापासूनच तापु लागले आहे. निवडणूकिसाठी थोड़ा अवधी राहिला असलातरी कुठल्या राजकीय पक्षाकडून निवडणूक लढवायची, तिकीट मिळेल का नाही यासाठी चाचपनी चालू असून मंगलवेढा तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात वाढते दौरे, कार्यालय उद्घाटन, उपस्थिती, मदत अतापासुनच दिसू लागली आहे.

जो तो आपल्या परिने चंग बांधून तयारीत असून आमदारकीचे स्वप्न पडू लागले आहे. मोहोळ तालुक्यातील भीमा परिवाराचे मुख्य प्रवर्तक खासदार धनंजय महाडिक यांचे समर्थक जिल्हा परिषद सदस्य शैला गोडसे पुढील राजकीय परिस्थितिचा अंदाज घेऊन पंढरपुर येथे शिवसेना पक्षा मधे प्रवेश करुण शिवसेना पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी तयारीला लागले आहेत. त्यांनी भीमा स्थिरीकरण योजेनेचे चळवळ चालू ठेऊन आपल्या मतदार संघात रास्ता रोखो, मोर्चे, विविध विकास कामे, गाठी भेटी यामुळे कार्यकर्त्यांशी संपर्क ठेऊन आपले जाळे निर्माण केले आहेत. या मतदार संघात सध्या कांग्रेस पक्षाचे आमदार भारत भालके असले तरी कांग्रेस व राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यंना विश्वासात घेऊन ताळ मेळ लावला असला तरी कांग्रेसकडून का राष्ट्रवादी पक्षा कडून लढणार तरीपण कांग्रेस, राष्ट्रवादी पक्, भाजप, इतर पक्षाचे उमेदवार कोण? याची उत्सुकता या मतदार संघात लागली आहे.

मंगलवेढा मतदार संघ हा पूर्वीपासून खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षास माननारा असून नगरपालिका ताब्यात असून ग्रामीण भागात कार्यकर्त्यंच्या माध्यमातून बांधणी केली असून या पक्षाने तालुका व ग्रामीण भागात संधच्या निवडी, लोकचळवळ, मोर्चे, उपोषण, रास्ता रोखो अशा माध्यमातून आक्रमक असून पक्षाची फळी निर्माण केली आहे. त्यामुळे हा मतदार संघ राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष दावेदार आहे असे दाख़वुन दिले आहे. धनश्री परिवाराचे मुख्य प्रवर्तक शिवाजीराव काळुंगे कांग्रेस पक्षाचे असलेतरी त्यांनी पाणी परिषद, धनश्री परिवार या माध्यमातून ग्रामीण, शहरी भागात संपर्क ठेवला असून ते केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे खंदे समर्थक असून विविध भागात गाठी भेटी, लोकचळवळ यावर भर दिला आहे. त्यामुळे कांग्रेस पक्षाचे उमेदवार कोण ? याची उत्सुकता आहे.

विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक भाजपचे  जवळीक असलेतरी त्यांचा मंगलवेढा-पंढरपुर मतदार संघात चांगला संपर्क असून विविध सहकारी संस्थाच्या माध्यमातून  मदत, उद्घाटन, उपस्थितीत, नगरपालिका, संपर्क कार्यालयावर जोर दिला असून अतापासून तयारीला लागले आहेत. मागील निवडणुकीत शिवसेना पक्षाकडून मंगलवेढ़याचे भूमिपुत्र समाधान आवताड़े निवडणूक लढवली होती. सध्या आवताड़े गटाच्या ताब्यात दामाजी शुगर, पंचायत समिती, जिल्हा परिषद सभापती, सहकारी संस्था, अनेक ग्रामपंचायत असून त्यांनी आपल्या गटाचे शहरी व ग्रामीण भागात जाळे निर्माण केले आहे. त्यामुळे राजकीय परिस्थितिचा खलबदेचा अंदाज घेऊन शिवसेना, भाजप का अपक्ष लढवायची येणारी परिस्थितीच कळेल. त्यामुळे निवडणुकीस अवधी असलातरी चर्चेला उधान आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com