पंढरपुर आणि मंगळवेढा मतदार संघाला निवडणूकीचे वेध

pandharpur mangalvedha politics
pandharpur mangalvedha politics

मंगळवेढा - कुरुल गटाच्या जि. प. सदस्या शैला धनजय गोडसे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे त्या शिवसेनेच्या पंढरपुर मंगळवेढा मतदार संघाच्या संभाव्य उमेदवार मानल्या जात असून त्या निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे चित्र गेल्या काही महिन्यातील त्यांच्या हालचालीतून स्पष्ट होत असले तरी सध्या शिवसेनेत असलेले दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे गटांची भूमिका शिवसेनेसाठी निर्णायक ठरणार आहे.

येत्या वर्षभरात विधानसभेच्या निवडणुका होणार असा होरा सर्वच राजकीय पंडिता कडून वर्तवण्यात येत असल्याने या पार्श्वभूमीवर गोडसे या तालुक्यात व शिवसेनेत खुप सक्रिय झाल्या आहेत. जि. प. सदस्य होण्याअगोदर त्यांनी पदवीधर मतरदार संघातून आपले नशीब आजमावन्याचा प्रयत्न केला त्यात अपयश आले. जिल्हा परिषद कुरुल गटात वजय मिळवला आणि त्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढला. त्या सोशल मीडियावर देखील जास्त सहभागी असतात.

पंढरपुर आणि मंगळवेढा भागात त्यांचे नातेवाईक आणि मित्र परिवार आप्तेष्टही आहेत. शिवाय पदवीधर निवडणुकीत त्यांनी या भागात अनेकांशी जनसंपर्क ठेवला होता. त्यांचे समर्थक सोशल मीडियावर मंगळवेढ्याला चौथा पर्याय मिळू शकतो, अशा प्रकारच्या चर्चा घडवत आहेत. अशातच रौप्य महोत्सवी पाणी परिषदेत त्यानी व्यासपीठावर स्थान मिळवत पाणी ज्ञान दिले. याशिवाय मध्यंतरी कृष्णा भीमा स्थिरीकरण या मुद्द्याला आपला अजेंडा बनवत ही योजना तालुक्याच्या किती हिताची आहे, ही भूमिका समजावून सांगितली आहे.

या शिवाय तालुक्यातील सहकारी साखर कारखान्याच्या मोळी पूजन,कुस्ती आखाड्याचे उदघाटन त्याला हजेरी लावली ,सध्या शैक्षणिक क्षेत्रात तालुक्यातील भोसे, खोमनाळ, मंगळवेढा येथे नर्सरी ते जूनियर कॉलेज पर्यन्त यूनिट उभारणी सुरु आहे भोसे येथे सुरुही केले आहे. त्यांच्या जवळच्या असलेल्या निकटवर्तीया कडून याबाबत दुजोरा मिळत आहे.

मात्र त्यांना ही वाट तितकीशी सोपी नाही. कारण 2009 मध्ये मतदार संघ पुंरर्चनेनंतर पंढरपुर आणि मंगळवेढा तालुका मिळून हां विधानसभा मतदार संघ झाला असुन यात मोठी स्पर्धा दोन निवडणुकीत पहायला मिळाली आहे. आ. भारत भालके हे व्यापक जनसंपर्क असणारे नेते आहेत. त्यांना दोन वेळा जनतेने संधी दिली आहे. ते आता हैटट्रिक साधण्याचा प्रयत्न करतील.

शिवाय आ. परिचारक यांची यूटोपियन अर्बन बैंक दूध संघ या माध्यमातून उभारलेली यंत्रणा तगडी आहे. पंढरपुरात या दोन्ही नेत्यांच्या बेस मजबूत आहे यात शिरकाव करणे मोठे आव्हान असले तरी गत निवडणुकीत शिवसेनेने आवताडे रुपाने मोठी लढत दिली. कमी मतदार असलेल्या पंढरपूर विभागात शिवसेनेने आवताडेमुळे चाळीस हजार मतदार मिळविले.

सध्या आगामी निवडणूकीसाठीही आवताडेची भुमिकाच शिवसेनेनेसाठी महत्वाची ठरणार आहे. पंढरपूर विभागात शिवसेनेने आपली पाळीमुळे गच्च करण्यासाठी विधान परिषद किंवा महामंडळावर आवताडेंना संधी देणे आवश्यक होते पण शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्याकडे केलेले दुर्लक्षच भविष्यात अडचणीचे ठरणार आहे. सध्या राजकीय वातावरण शांत असले तरी गोडसे यांच्या शिवसेना प्रवेशाने त्यांच्या हालचाली मात्र आमदारकीला संधी साधता येईल का, या दिशेने सुरु असल्याच्या चर्चेला राजकीय आखाड्यात ऊत आला तरी तालुक्यात लोकांच्या संपर्कात येण्याची एकही संधी त्या सोडत नाहीत. त्यामुळे विधिमंडळातील प्रवेश त्यांच्यासाठी आव्हानच ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com