पंढरपूरमध्ये सहायक अभियंत्यास लाच घेताना पकडले

अभय जोशी
मंगळवार, 30 जानेवारी 2018

पंढरपूर ः महावितरण कंपनीचे दोन अधिकारी आणि एक ऑपरेटर अशा तीन जणांना लाच घेताना आज (मंगळवार) रंगेहात पकडण्यात आले. पंढरपूर ग्रामीण मधील उप कार्यकारी अभियंता संतोष चंद्रकांत सोनवणे, सहायक अभियंता जयप्रकाश महादेव कदम, ऑपरेटर चंद्रशेखर परशुराम जाधव अशा तीन जणांच्याविरुध्द सापळा रचून आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. एकाच दिवशी तीन जणांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई झाल्याने खळबळ उडाली.

आज येथील नवी पेठ मधील विमल पान शॉप अतिक्रमण हटाव मध्ये काढण्यात आले होते. त्यामधील वीज जोडणी तोडून नवीन ठिकाणी वीज जोडणी करता महावितरण शाखा पंढरपूर कडे तक्रारदाराने अर्ज केला होता. नवीन जोडणीसाठी तक्रारदाराकडे एक हजार रुपये लाच मागितली होती. आज सकाळी सव्वा अकराच्या सुमारास ही लाचेची रक्कम स्विकारताना तक्रारदाराच्या पान दुकानाचे ठिकाणी सहायक अभियंता (वर्ग 2) जयप्रकाश महादेव कदम यांना रंगेहात पकडण्यात आले.

तालुक्‍यातील करकंब भागातील महावितरण मधील वरिष्ठ तंत्रज्ञास निलंबित करण्यात आले होते. त्याचे निलंबन रद्द करुन कामावर घेण्यासाठी चाळीस हजार रुपये लाच घेतली होती. आज त्याच्याकडून लाचेचा दुसरा हप्ता म्हणून पंधरा हजाराची लाच घेताना पंढरपूर ग्रामीण मधील उप कार्यकारी अभियंता संतोष चंद्रकांत सोनवणे आणि ऑपरेटर चंद्रशेखर परशुराम जाधव यांना रंगेहात पकडण्यात आले. जयप्रकाश कदम यांच्या विरोधात पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात तर संतोष चंद्रकांत सोनवणे आणि ऑपरेटर चंद्रशेखर परशुराम जाधव या दोघांच्या विरोधात करकंब पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोलापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक श्री.देवकर, पोलिस निरीक्षक श्री. मारकड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.

Web Title: pandharpur news assistant engineer was caught taking bribe