गोमुख कुंडात लघुशंका करणाऱया बडव्याची शिक्षा कायम

अभय जोशी
मंगळवार, 23 जानेवारी 2018

पंढरपूर: येथील श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरातील गोमुख कुंडात लघुशंका करुन उपसनास्थान अपवित्र केल्याप्रकरणी आरोपी गोपाळ बडवे याला 2010 साली येथील येथील प्रथम वर्ग न्यायालयाने 3 महिने कैद व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेच्या विरोधात आरोपीने जिल्हा सत्र न्यायालयात अपिल केले होते. त्या प्रकरणी आज (मंगळवार) जिल्हा न्यायाधीश पी. आर. देशमुख यांनी आरोपीचे अपिल नामंजूर करुन आरोपीची शिक्षा कायम ठेवल्याचा निर्णय दिला.

या प्रकरणाची हकीगत अशी की, 15 मे 2003 रोजी रात्री दिड वाजण्याच्या सुमारास आरोपी गोपाळ बडवे हा मंदिरातील गोमुख कुंडामध्ये लघुशंका करत असताना तिथे कार्यरत असलेल्या मंदिर सुरक्षा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाहिले होते. त्यामुळे हिंदू धर्मीयांच्या व भाविकांच्या भावना दुखावल्या म्हणून आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणी 5 जून 2010 रोजी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी आरोपीस 3 महिने साधी कैद व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती.

या शिक्षेच्या विरोधात आरोपीने येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. मंदिर समिती व पुजारी यांच्यात वाद असल्यामुळे आरोपीस खोट्या प्रकरणात गुंतवण्यात आले आहे, असा युक्तीवाद आरोपीच्या वतीने करण्यात आला. सरकार तर्फे घटनेचे नेत्र साक्षीदार पुंडलिक जाधव, औदुंबर डोंगरे, बाळासाहेब माळी, माणिक यादव यांच्या साक्षी झाल्या. श्री विठ्ठलाच्या पूजेचे अभिषेकाचे पाणी (तीर्थ) गोमुखाव्दारे कुंडामध्ये पडते व हे पाणी भाविक तीर्थ म्हणून पितात. गोमुख अत्यंत पवित्र समजले जाते. आरोपीच्या कृत्यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे आरोपीची शिक्षा कायम ठेवावी असा युक्तीवाद सरकारी वकील ऍड. सारंग वांगीकर यांनी न्यायालयात केला. हा युक्तीवाद व न्यायालयात सादर करण्यात आलेला पुराव व कागदपत्रे याचे अवलोकन करुन जिल्हा न्यायाधीश श्री. देशमुख यांनी आरोपीची शिक्षा कायम ठेवली.

Web Title: pandharpur news badwa court punished continue