आमचे सरकार हे शेतकऱ्यांचे सरकारः देवेंद्र फडणवीस

अभय जोशी
सोमवार, 3 जुलै 2017

पंढरपूरः आमचे सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ कर्ज माफी देऊन आम्ही थांबणार नाही. त्यांना कर्ज मुक्ती पर्यंत आम्हाला न्यायचे आहे. त्यांच्या जीवनात परिवर्तन केल्या शिवाय आम्ही राहणार नाही. शेतकऱ्यांचे आणि गरीबांचे कल्याण हे या सरकारचे ब्रीदवाक्‍य असेल. शेतकऱ्यांनी या सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

आषाढी यात्रेच्या निमित्ताने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरविण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृषी पंढरी प्रदर्शनाचे उदघाटन आणि शेतकरी मेळाव्याचे प्रसंगी श्री. फडणवीस बोलत होते.

पंढरपूरः आमचे सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ कर्ज माफी देऊन आम्ही थांबणार नाही. त्यांना कर्ज मुक्ती पर्यंत आम्हाला न्यायचे आहे. त्यांच्या जीवनात परिवर्तन केल्या शिवाय आम्ही राहणार नाही. शेतकऱ्यांचे आणि गरीबांचे कल्याण हे या सरकारचे ब्रीदवाक्‍य असेल. शेतकऱ्यांनी या सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

आषाढी यात्रेच्या निमित्ताने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरविण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृषी पंढरी प्रदर्शनाचे उदघाटन आणि शेतकरी मेळाव्याचे प्रसंगी श्री. फडणवीस बोलत होते.

व्यासपीठावर पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकर परिचारक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीचे नूतन अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, नगराध्यक्षा साधना भोसले, बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे, उपसभापती विवेक कचरे आदी उपस्थित होते.

श्री.फडणवीस म्हणाले, दिवसाचे बारा तास अखंड वीज पुरवठा झाला पाहिजे यासाठी सोलरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वीज पुरवठा केला जाणार आहे. फिडर सोलर वर टाकण्यात येणार आहेत. येत्या आठवड्यात राळेगणसिध्दी येथे अशा पहिल्या फिडरचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. आपल्या कडे सध्या अस्तित्वात असलेले पंप एनर्जी इफिशियंट नाहीत. त्यामुळे जादा वीज खर्ची होते हे लक्षात घेऊन आता आम्ही एनर्जी इफिशियंट पंप उपलब्ध करुन देणार आहोत. मोठ्या प्रमाणावर फळ प्रक्रिया उद्योग येत्या काळात उभा केले जाणार आहेत. विपणनाची व्यवस्था, वखारींची व्यवस्था वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्पादन वाढीला प्रोत्साहन देतानाच शेतकऱ्यांना थेट मार्केटही उपलब्ध करुन देण्याची भूमिका या सरकारने घेतलेली आहे.

श्री. फडणवीस म्हणाले, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना देशातील कोणत्याही राज्याने कर्जमाफी दिलेली नाही. अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. राज्याचा अर्थसंकल्प 4 हजार कोटी रुपये तुटीचा आहे. पण काळजी करण्याचे कारण नाही. तूट भरुन काढून 34 हजार कोटीच्या कर्जमाफीसाठी पैसा उभा करु. शेती क्षेत्रातील गुंतवणूक बंद , ड्रीपची, शेततळ्यांची, सिंचनाची गुंतवणूक बंद झाली तर शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होईल. तसे घडू नये यासाठी कृषीक्षेत्रातील गुंतवणूक कुठल्याही प्रकारे आम्ही कमी होऊ देणार नाही. कर्जमाफीची योजना फसवी आहे असा अपप्रचार काही लोकांकडून केला जात आहे. व्हाटस्‌अप च्या माध्यमातून या विषयी लोकांना चूकीची संदेश पाठवले जात आहेत असे सांगून श्री.फडणवीस यांनी कर्जमाफीचा फायदा राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील किती लाख शेतकऱ्यांना होणार आहे याची जिल्हावार आकडेवारी वाचून दाखवली.

यावेळी कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर म्हणाले, गेल्या पंधरा वर्षात शेतकऱ्यांसाठी घेतले गेले नव्हते इतके अनेक चांगले निर्णय मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी घेतले आहेत. यापुढच्या काळातही शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जाणार आहेत.

महसूल मंत्री चंद्रकात पाटील म्हणाले, ब्रिटीश काळापासुन दर 8 वर्षानी शेतक-यांवर हलाखीची परिस्थती ओढवते म्हणून आमच्या सरकारने शेतक-यांना सक्षम करण्याचे ठरवले. त्याकरीता स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आम्ही पहिल्यांदा शेतक-यांना सर्वात मोठी ऐतिहासिक कर्जमाफी दिली. महाराष्ट्रातील 89 लाख शेतक-यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. शेतक-याच्या मुलगा म्हणुन मी मुख्यमंत्री देवेद्रंजी फडणवीस यांचे आभार मानतो.

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, शेतक-यांना सन्मानाने उभे करण्यासाठी जागतिक बॅकेच्या अर्थसहाय्याने 4 हजार कोटी रूपयांचा "नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प" आम्ही राबविणार आहोत. त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारात पारदर्शकता आली पाहिजे याकरीता आमच्या सरकारने शेतक-यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेतला आहे.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून ऐतिहासिक कर्जमाफी दिल्याबद्दल शेतकऱ्यांच्या वतीने श्री.फडणवीस यांना बैलगाडीची प्रतिकृती भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

प्रारंभी कार्यक्रमाचे संयोजक आमदार प्रशांत परिचारक यांनी प्रास्ताविक केले. मनोज गायकवाड यांनी सूत्रसंलचन केले. शेवटी सभापती दिलीप घाडगे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकरी संघटनेने दिलेल्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
सरपंच आता थेट लोकांमधून निवडणार
औरंगाबाद: दारुमुक्तीसाठी रणरागिणी एकवटल्या, फोडल्या बाटल्या
भाजपला मते देवून सांगली जिल्ह्याचा विकास खुंटला: अजित पवार
ट्रम्प मूर्ख; काश्‍मीर संघर्ष थांबणार नाही: सईद सलाहुद्दीन​
सदाभाऊ हाजिर व्हा; स्वाभिमानीची नोटीस​
या परिस्थितीला काँग्रेस जबाबदार- नितीश कुमार​
पेट्रोलपंप चालकांचा 12 जुलैला देशव्यापी संप
गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या वडिलांची दादागिरी​
चांगला कर साधासरळ ठरावा!​
#स्पर्धापरीक्षा - आय एन एस तिहायु​
भारताचा विंडीजकडून 11 धावांनी पराभव​
प्रणवदांनी वडिलांसारखी काळजी घेतली : मोदी​
चीनबरोबरील वाद: सिक्कीममध्ये लष्कराच्या अतिरिक्त तुकड्या​
Web Title: pandharpur news bjp government farmer's say devendra fadnavis