पंढरपूरः श्री विठ्ठल मंदिरात हाणामारी; दोन निलंबित

अभय जोशी
मंगळवार, 25 जुलै 2017

पंढरपूरः श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरातील एक सुरक्षा रक्षक आणि एक हंगामी कर्मचारी यांच्यात रविवारी (ता.23) दुपारी बारा वाजता दर्शनाला भाविक सोडण्याच्या कारणावरुन धक्काबुक्की व हाणामारीची घटना घडली होती. या घटनेची दखल घेऊन सुरक्षा रक्षक पांडुरंग साळुंखे आणि हंगामी कर्मचारी नारायण वाघ यांना पुढील आदेश देई पर्यंत निलंबित केले आहे, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी संजय तेली यांनी "सकाळ"शी बोलताना दिली.

श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीने गेल्या काही वर्षात अनेक हंगामी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. दर्शनाला मधून सोडण्यावरुन अनेकवेळा वाद होत असतात. काही कर्मचारी पैसे घेऊन भाविकांना मधून सोडतात अशी चर्चा सातत्याने होत असते. या पार्श्‍वभूमीवर रविवारी श्री विठ्ठल मंदिरात दर्शनाला लोक सोडण्याच्या कारणावरुन सुरक्षा रक्षक पांडुरंग साळुंखे आणि हंगामी कर्मचारी, वाहनचालक नारायण वाघ यांच्यात वाद निर्माण झाला. त्यातून त्यांच्यात धक्काबुक्की होऊन हाणामारीची घटना घडली होती. या घटनेची दखल घेऊन मंदिर समितीचे सदस्य सचिन अधटराव यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी समितीचे कार्यकारी अधिकारी श्री. तेली यांच्याकडे केली होती.

समितीचे नूतन अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी चारच दिवसापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत गैरवर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गय करणार नाही, असा इशारा दिला होता. आणि त्यानंतर लगेचच रविवारी मंदिर समितीच्या प्रतिमेला बाधा येईल अशी घटना समितीच्या कर्मचाऱ्यांकडून मंदिरात घडल्याने अध्यक्ष डॉ. भोसले यांनीही संबंधितांवर त्वरीत कारवाई करण्याच्या सूचना कार्यकारी अधिकारी श्री. तेली यांना दिल्या होत्या. त्यानुसार मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी संजय तेली यांनी पैसे घेऊन दर्शनाला लोक सोडण्याच्या कारणावरुन वाद झाला का अन्य कारणावरुन याची चौकशी केली जाणार आहे. दोघांना निलंबित करण्यात आले असून, शिस्तभंगाची कारवाई सुरु करण्यात आली आहे. घडलेल्या घटनेचे सीसीटीव्ही फूजेट पाहून पुढील कारवाई केली जाणार आहे, असे श्री. तेली यांनी "सकाळ" शी बोलताना सांगितले.

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:

Web Title: pandharpur news clash in temple; two Suspended