नगरसेवक संदिप पवार यांच्या खून प्रकरणी गुन्हा दाखल

अभय जोशी
सोमवार, 19 मार्च 2018

पंढरपूर ः येथील अपक्ष नगरसेवक संदिप पवार यांच्या खून प्रकरणी अक्षय उर्फ बबलू सुरवसे, विकी उर्फ विकास मोरे, संदिप अधटराव या तीन संशयितांसह अन्य सहा ते सात अनोळखी विरोधात सोमवारी पहाटे पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आज (सोमवार) सकाळी मयत संदिप पवार यांच्या अंत्ययात्रेच्या वेळी वडार समाजातील लोकांनी ठिय्या आंदोलन करुन आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली. सहायक पोलिस अधिक्षक निखील पिंगळे यांनी आश्‍वासन दिल्यानंतर अंत्ययात्रा पुढे नेण्यात आली. दरम्यान, आज दुसऱ्या दिवशी देखील शहरातील बहुतांष व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती.

नगरसेवक संदिप पवार यांच्यावर काल भरदिवसा दुपारी एकच्या सुमारास गोळीबार करुन कोयत्याने वार करुन त्यांचा खून करण्यात आला. या प्रकरणी त्यांची आई माजी नगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका सुरेखा दिलीप पवार (वय 54 रा. भादुले चौक, पंढरपूर) यांनी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. संदिप पवार यांचा लहान भाऊ प्रदिप उर्फ भैय्या पवार याच्या सोबत आरोपी अक्षय उर्फ बबलू सुरवसे याचे चौकात उभे राहण्यावरुन व रागाने पाहिल्यावरुन मारामारी झाली होती. त्याचा राग मनात धरुन आरोपीने अक्षय उर्फ बबलू सुरवसे याने विकी उर्फ विकास मोरे, संदिप अधटराव यांच्यासह सहा ते सात जणांच्या मदतीने संदिप पवार यांचा खून केला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या फिर्यादी वरुन पोलिसांनी सोमवारी पहाटे पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

दरम्यान, रविवारी सोलापूर येथे मयत पवार यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर रात्री मृतदेह पंढरपूर येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आला होता. सकाळी नऊच्या सुमारास ट्रॅक्‍टर वर पवार यांचा मृतदेह ठेवून अंत्ययात्रा काढण्यात आली. यात्रेत सहभागी झालेल्या लोकांनी शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन केले. तिथे वडार समाजाचे ज्येष्ठ नेते विजय चौगुले यांनी स्थानिक पोलिसांनी संदिप पवार यांना काळजी घेण्यास सांगितले होते. परंतु, पोलिसांनी संबंधित आरोपींवर तत्काळ कारवाई केली असती तर ही घटना टळली असती असे सांगून आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली. तेंव्हा सहायक पोलिस अधिक्षक निखील पिंगळे यांनी संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली असून, लवकरच योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्‍वासन दिल्यावर अंत्ययात्रा पुढे नेण्यात आली. अंत्ययात्रेत लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्मशानभूमीत मयत पवार यांचे बंधू भैय्या पवार यांनी अंत्यसंस्कार केले. पोलिसांनी दक्षता म्हणून प्रमुख ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

दरम्यान, पोलिसांनी सीसीटिव्ही फूटेजच्या मदतीने तपासाला वेग दिला असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल असे पोलिस अधिक्षक विरेश प्रभू यांनी सांगितले.

...तर ही घटना टळली असती
वडार समाजाचे मुंबई येथील ज्येष्ठ नेते विजय चौगुले यांनी आज दुपारी अंत्यंसंस्कार झाल्यावर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, पोलिसांना वडार समाजाचे कायम सहकार्य असते.पोलिसांनी संदिप पवार यांना दक्षतेची सूचना दिली होती. परंतु, पोलिसांनी संबंधित आरोपींवर तत्काळ कारवाई केली असती तर ही घटना टळली असती. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळेच पवार यांचा खून झाला आहे. आरोपींना त्वरीत अठक न झाल्यास राज्यातील वडार समाज पंढरपुरात एकत्र करुन आंदोलन केले जाईल, असा इशारा ही त्यांनी दिला. मयत पवार यांचे बंधू भैय्या पवार व आईस पोलिस संरक्षण देण्याची मागणी ही त्यांनी केली.

Web Title: pandharpur news corporator sandeep murder case