मुख्यमंत्र्यांच्या विदर्भातील शेतकऱ्यांचे पंढरपुरात आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

पंढरपूर - राज्यभरात विरोधकांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारविरोधी हल्लाबोल सुरू असतानाच विदर्भातील नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी आज पंढरपुरात फडणवीस सरकारच्या विरोधात विठ्ठल दरबारी आंदोलन केले. यावेळी, बा विठ्ठला, या फडणवीस सरकारला शेतकरी हिताची सुबुद्धी दे! असे साकडेही शेतकरी व गुरुदेव सेनेच्या कार्यकर्त्यांनी घातले. 

राष्ट्रवादीने पुन्हा सुरू केलेल्या हल्लाबोल आंदोलनामुळे राज्यातील जनतेमध्ये सरकारविरोधी भावना तयार होऊ लागली आहे. अशातच मुख्यमंत्र्यांच्या विदर्भातील शेतकऱ्यांनी सरकारविरोधात एल्गार पुकारल्याने या आंदोलनाला विशेष महत्त्व आले आहे. विविध मागण्या घेऊन यवतमाळ जिल्ह्यातील अनेक शेतकरी आज पंढरपुरात विठ्ठलाच्या दरबारात येऊन धडकले. विदर्भातून आलेल्या शेतकरी आणि महिलांनी सकाळी नामदेव पायरीजवळ काही वेळ थांबून सरकारविरोधी घोषणा देत भाजप सरकारबद्दलचा रोष व्यक्त केला. त्यानंतर महाद्वार ते शिवाजी चौकापर्यंत शेतकऱ्यांनी सरकारविरोधात मोर्चा काढून शिवाजी चौकात जाहीर सभा घेतली. यावेळी गुरुदेव सेनेचे अध्यक्ष संदीप भोयर यांनी राज्य सरकारवर टीका केली. 

- शेतीमालाला हमीभाव मिळावा 
- शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करावी 
- कापसावरील बोंड अळीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी 
- शेतीपंपांचे वीजबिल माफ करावे 

Web Title: pandharpur news Farmers of Vidarbha movement at Pandharpur