घाटजोडणीच्या कामास पंढरपुरात सुरवात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 डिसेंबर 2017

पंढरपूर - चंद्रभागा नदीतीरावरील घाटजोडणीच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला असून, विप्रदत्त घाट ते चंद्रभागा घाटादरम्यानच्या कामाला सुरवात करण्यात आली आहे.

पंढरपूर - चंद्रभागा नदीतीरावरील घाटजोडणीच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला असून, विप्रदत्त घाट ते चंद्रभागा घाटादरम्यानच्या कामाला सुरवात करण्यात आली आहे.

चंद्रभागा नदीतीरावरील विप्रदत्त घाट ते उद्धव घाट यादरम्यानचे चंद्रभागा घाट, कासार घाट, महाद्वार घाट, कुंभार घाट, दत्त घाट, उद्धव घाट हे एकमेकांना जोडण्यात येणार आहेत. या कामासाठी मागील काही महिन्यांपासून वाळवंटामध्ये दगड घडविण्याचे काम जोरात सुरू आहे.

यासाठी तालुक्‍याच्या आसपासच्या परिसरातून बेसॉल्ट दगड आणला जात आहे. सुमारे 200 कारागीर छिन्नी-हातोड्याच्या साह्याने दगड घडविण्याचे काम करीत आहेत.

Web Title: pandharpur news Ghat connection work starts in Pandharpur

टॅग्स