काव्यसंग्रहाच्या शिर्षकामुळे 'गिनिज'मध्ये झाली नोंद

अभय जोशी
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

पंढरपूर : गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद व्हावी यासाठी अनेक जण शक्कल लढवत असतात. वेगवेगळे विक्रम प्रस्थापित करत असतात. येथील कवी रवी सोनार यांनी देखील त्यांच्या एका काव्यसंग्रहाचे शिर्षक तब्बल 2 हजार 57 शब्दांचे करुन गिनिज बुकला दखल घेण्यास भाग पाडले आहे. "जगातील सर्वांत दीर्घ शीर्षक" असलेले पुस्तक म्हणून श्री. सोनार यांच्या काव्यसंग्रहाची "गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड" मध्ये नोंद झाली आहे. मराठी साहित्य विश्‍वातील गिनिज बुक मधील ही बहुदा पहिलीच नोंद असावी असे श्री. सोनार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

कवी सोनार यांचे चार लावणीसंग्रह, एक गौळण संग्रह, भोवरा व भिंगरी हा ललितसंग्रह, सांजफुल ही कादंबरी यासह चार कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांचा "सखीसोबती.....क्षणवैविध्यांची गुंफण" हा संमिश्र काव्यसंग्रह 1 जानेवारी 2017 साली प्रकाशित झाला आहे. या काव्यसंग्रहाच्या शिर्षकामध्ये तब्बल 2 हजार 57 शब्द असून 6 हजार 76 अक्षरे आहेत. हे शीर्षक लिहिण्यासाठी त्यांनी तब्बल सात वर्षे परिश्रम घेतले. या काव्यसंग्रहामध्ये श्री. सोनार यांनी त्यांच्या पत्नीस पहायला गेल्यापासून ते लग्नाच्या अठराव्या वाढदिवसांपर्यंतच्या कालावधीतील ठळक आणि महत्वपुर्ण आठवणी गुंफल्या आहेत. याकरिता त्यांनी द्विपदी, क्षणिका, हायकु, चारोळी आणि प्रश्‍नांतिक त्रिवेणी या पाच काव्यात्मक साहित्यकृतींचा वापर या कवितासंग्रहामध्ये केला आहे. एकाही शब्दाची त्यांनी पुनरावृत्ती केलेली नाही.

काव्यसंग्रहाच्या शीर्षकाच्या दिर्घतेची नोंद गिनिज बुकमध्ये व्हावी यासाठी श्री.सोनार यांनी इमेलद्वारे इंग्लंड मधील त्यांच्या कार्यालयाशी पत्रव्यवहार केला. त्यांच्या अथक प्रयत्नांना यश प्राप्त झाले व त्यांच्या कवितासंग्रहास "गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड" ने "द लॉंगेस्ट टायटल ऑफ अ बुक" अशी नोंद केली. श्री.सोनार यांना यावर्षी 17 जानेवारी रोजी अशा आशयाचे प्रमाणपत्र व पदक देऊन सन्मानीत करण्यात आले आहे.

पत्रकार परिषदेच्या वेळी त्यांच्यासोबत पत्नी सविता तसेच कुटुंबिय उपस्थित होते. आपल्या लेखन प्रतिभेने पंढरीचा झेंडा सातासमुद्रापार फडकवल्याबद्दल त्यांचे पंढरपूर मधील साहित्यप्रेमींकडुन अभिनंदन करण्यात येत आहे.

Web Title: pandharpur news ginij book record title of poetry