पंढरपूर बंदला शंभर टक्के प्रतिसाद

अभय जोशी
गुरुवार, 4 जानेवारी 2018

पंढरपूर: कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ आज (गुरुवार) येथील विविध आंबेडकरवादी संघटनांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पंढरपूर बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व भागातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. परंतु, तरीही काही समाजकंटकांनी काही दुकानांवर दगडफेक करुन काचा फोडल्या. त्यामुळे थोडा वेळ शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पंढरपूर: कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ आज (गुरुवार) येथील विविध आंबेडकरवादी संघटनांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पंढरपूर बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व भागातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. परंतु, तरीही काही समाजकंटकांनी काही दुकानांवर दगडफेक करुन काचा फोडल्या. त्यामुळे थोडा वेळ शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ आयोजित केलेल्या बंद मुळे शहरातील सर्वच भागातील व्यापाऱ्यांनी सकाळ पासून आपआपली दुकाने बंद ठेवली होती. शहरातील पेट्रोल पंप तसेच मंडई, खासगी रुग्णालयांसह औषध दुकानदारांनी देखील दुकाने बंद ठेवली होती. दुपारी अकराच्या सुमारास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या जवळ शहरातील रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्यने जमा झाले. यावेळी महिला, तरुण मुली व मुलांचा सहभाग मोठा होता.

डी. राज सर्वगोड, बाळासाहेब कसबे, जितेंद्र बनसोडे, राजू सर्वगोड, सुनिल सर्वगोड, कृष्णा वाघमारे, दिलीप देवकुळे, दिपक चंदनशिवे, संतोष पवार, आप्पासाहेब जाधव, अर्जुन मागाडे, आंबादास वायदंडे, कैलास कांबळे, दयानंद बाबर, किर्तीपाल सर्वगोड, संजय सावंत, संजय शिवशरण, समाधान लोखंडे, अमित कसबे, उमेश सर्वगोड, अरविंद कांबळे, लक्ष्मण कांबळे, महादेव भालेराव, आबासाहेब आगवणे, नागेश यादव, रमेश कांबळे आदीनी तिथे बोलताना निषेध व्यक्त करत दोषींना अटक करण्याची मागणी केली.

या प्रसंगी किरण घाडगे, स्वागत कदम, शैलेश साळुंखे, लक्ष्मण शिरसट, विक्रम शिरसट, अरुण कोळी, ऍड. राजेश भादुले, महेश साठे, पोपट क्षीरसागर, सुधीर धुमाळ, सुनील बाबर, सुरेश शिंदे, गुरु दोडीया, संदिप मांडवे, अनिल अभंगराव, प्रशांत घोडके, मोहन अनपट, मनोज आदलिंगे यांनी निषेध सभेला पाठींबा देणारी मनोगते व्यक्त केली. त्याच ठिकाणी तहसिलदार मधुसुदन बर्गे यांना निवेदन देण्यात आले. निषेध सभा संपल्यावर सहायक पोलिस अधिक्षक निखील पिंगळे यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले.

दक्षता म्हणून राज्य राखीव पोलिस दलासह शहराच्या सर्व भागात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिस अधिक्षक विरेश प्रभू यांनी शहरात फिरुन पोलिस बंदोबस्ताची पाहणी केली.

Web Title: pandharpur news koregaon bhima issue and pandharpur bandh