पंढरपूर: विठ्ठल मंदिरात सफाई करताना एकाचा मृत्यू

अभय जोशी
मंगळवार, 20 जून 2017

आषाढी यात्रेपूर्वी दरवर्षी पुण्यातील एका ज्वेलर्सकडून श्री विठ्ठल मंदिरातील गाभारा तसेच चांदीच्या दरवाजावर पॉलीश करण्याचे काम कामगार नेमून त्यांच्या मार्फत मोफत करुन दिले जाते. त्या प्रमाणे यंदा देखील मंदिरातील पॉलिश कामासाठी कामगार आले होते.

पंढरपूर - आषाढी यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर श्री विठ्ठल मंदिराची सफाई करताना एकाचा मृत्यू झाल्याची घटना आज (मंगळवार) घडली. 

मिळालेल्या माहितीनुसार, आषाढी यात्रेपूर्वी दरवर्षी पुण्यातील एका ज्वेलर्सकडून श्री विठ्ठल मंदिरातील गाभारा तसेच चांदीच्या दरवाजावर पॉलीश करण्याचे काम कामगार नेमून त्यांच्या मार्फत मोफत करुन दिले जाते. त्या प्रमाणे यंदा देखील मंदिरातील पॉलिश कामासाठी कामगार आले होते. काल (ता.19) रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास त्या प्रमाणे काम सुरु असताना अजय ज्ञानेश्‍वर पेठे (वय 25 रा. हडपसर, पुणे) हा तरुण कर्मचारी चक्कर येऊन पडला. त्याला तातडीने येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु असताना आज पहाटे चारच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी पेठे याचा मृतदेह येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
दंतेवाडामध्ये माजी सरपंचाची नक्षलवाद्यांकडून हत्या​
घोषणांच्या पावसात शेतकरी कोरडाच
पालखी सोहळ्यात वारकरी विरुद्ध धारकरी : नक्की प्रकार काय?
मस्ती असेल तर 'मुदतपूर्व' घ्याच : उद्धव ठाकरे
#स्पर्धापरीक्षा - GST​
दिल्लीत महिलेवर गाडीत सामूहिक बलात्कार करून फेकून दिले​
कोहलीला खरंच नकोयं कुंबळे प्रशिक्षक​
मुंबईत भोजपुरी अभिनेत्रीची आत्महत्या​
गरोदर लेकीला मारणाऱ्या नराधम बापाला अखेर फाशी

Web Title: Pandharpur news one person dead in vitthal mandir

टॅग्स