प्रभाकर देशमुख विरुध्द खंडणीचा गुन्हा दाखल

अभय जोशी
गुरुवार, 8 मार्च 2018

पंढरपूर ः जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर उर्फ भैय्या शिवाजीराव देशमुख (रा.पाटकूल, ता.मोहोळ) यानी एका महिलेस 72 लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून पोलिसांनी त्यांच्यासह एकूण चार जणांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी देशमुख यास अटक केली आहे.

या प्रकरणाची पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, विजया कोळी यांनी आज (गुरुवार) पहाटे पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात आरोपी भैय्या देशमुख, सचिन कारंडे, अनिल झुंजार (दोघे रा. पंढरपूर) आणि आणखी एक अनोळखी व्यक्ती अशा चार जणांच्या विरुध्द दिलेल्या फिर्यादी वरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी आपसात संगनमत केले. आरोपी भैय्या देशमुख आणि अन्य एकाने फिर्यादीच्या नातेवाईंकांच्या समवेत फिर्यादीच्या घराजवळ येऊन तडजोडीची भाषा वापरुन नंतर फिर्यादीचे पती तुकाराम कोळी यांना कारागृहामधून सोडवण्याचे खोटे कारण पुढे करुन सर्व गुन्हे संपवतो, तुम्ही काळजी करु नका असे म्हणून 72 लाख रुपये खंडणी देण्याची मागणी केली. खंडणीची रक्कम न दिल्यास तुमचे जगणे मुश्‍कील करुन टाकू. खोट्या गुन्ह्यांच्या मालिकेत अडकवून जन्मठेपेची शिक्षा लावू. आयुष्यभर खडी फोडायला पाठवतो अशी दमदाटी करुन जीवाला घातपात करण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रभाकर देशमुख यास अटक केली असून, पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे व सहायक पोलिस निरीक्षक श्‍याम बुवा पुढील तपास करीत आहेत.

Web Title: pandharpur news prabhakar deshmukh crime police