पंढरपुरात महा स्वच्छता अभियान; हजारो हात सहभागी

पंढरपूर: चंद्रभागा नदीपात्रात महास्वच्छता अभियानामध्ये सहभागी झालेल्या सकाळ-तनिष्काच्या सदस्या. (छायाचित्र- राजकुमार घाडगे, पंढरपूर)
पंढरपूर: चंद्रभागा नदीपात्रात महास्वच्छता अभियानामध्ये सहभागी झालेल्या सकाळ-तनिष्काच्या सदस्या. (छायाचित्र- राजकुमार घाडगे, पंढरपूर)

पंढरपूर: "गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला" असा जयघोष करत आज (मंगळवार) जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसह विविध शासकीय कर्मचारी, सकाळ-तनिष्का, सकाळ यंग इन्सपिरेटर्स नेटवर्कच्या विद्यार्थ्यांनी आज चंद्रभागा वाळवंटासह शहराच्या बहुतांष भागात स्वच्छता मोहिम राबवली. हजारो हातांनी आज चार तासात शहर स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला.

आषाढी यात्रेमुळे शहरात मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य झाले होते. नगरपालिकेचे सफाई कर्मचाऱ्यांपुढे शहर स्वच्छतेचे मोठे आव्हान होते. नगरपालिका कर्मचाऱ्यांना जिल्ह्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या मदतीचा हात मिळाल्यास शहर वेगाने स्वच्छ होईल, या भावनेने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी पंढरपुरात महास्वच्छता अभियान राबवण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या अभियानात सकाळ-तनिष्का, सकाळ यंग इन्सपिरेटर्स नेटवर्कच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे ठरवले होते.

आज सकाळी सात वाजल्या पासून चंद्रभागा वाळवंटात महाव्दार घाटाच्या लगत जिल्ह्यातून आलेले जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे सुमारे सहा हजार महिला व पुरुष कर्मचारी, अधिकारी, पंढरपूर नगरपालिकेचे कर्मचारी यांच्या बरोबरच पंढरपूर शहर व ग्रामीण भागातून आलेल्या सकाळ-तनिष्का, सकाळ यंग इन्सपिरेटर्स नेटवर्क चे विद्यार्थी गोळा झाले होते.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, नगराध्यक्षा साधना भोसले, "सकाळ" चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी, जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषदच्या समाजकल्याण सभापती शीला शिवशरण, जिल्हा परिषदेचे सदस्य उमेश पाटील, स्वेरी कॉलेजचे संस्थापक सचिव प्रा. डॉ. बी. पी. रोंगे तसेच विभागातील तहसिलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी आदींच्या उपस्थितीत दिपप्रज्वलन करुन या महास्वच्छता अभियानाला प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी डॉ. भोसले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारुड यांनी स्वच्छता अभियानासाठी मोठ्या संख्येने आलेल्या सर्वांचे स्वागत करुन ठरवून दिलेल्या भागात स्वच्छता करुन शहर स्वच्छ करण्याचे आवाहन केले.

श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर परिसर, नदीच्या पैलतीरावरील 65 एकर, चंद्रभागा वाळवंट, नदीवरील वेगवेगळे घाट, स्टेशन रोड आदी भागात कर्मचाऱ्यांनी हाती झाडू घेऊन गटागटाने स्वच्छता स्वच्छता केली. शहर व ग्रामीण भागातून आलेल्या तनिष्का सदस्या तसेच सकाळ यंग इन्सपिरेटर्स नेटवर्कचे विद्यार्थी या अभियानात मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. प्रारंभ स्वच्छता समन्वयक सचिन जाधव तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थितांना "गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला" असा गजर करत स्वच्छते विषयी प्रबोधन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com