औसेकर सहअध्यक्ष तर सहा नवीन सदस्यांची नियुक्ती 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

पंढरपूर/नातेपुते - श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीवर शासनाने गहिनीनाथमहाराज औसेकर यांची सहअध्यक्ष म्हणून निवड केली असून बुधवारी (ता. 4) आणखी सहा नवीन सदस्यांची नियुक्ती केली आहे. ज्ञानेश्‍वरमहाराज जळगावकर, शिवाजीराव मोरे, प्रकाश महाराज जवंजाळ, अतुलमहाराज भगरे गुरुजी, आमदार सुजितसिंह ठाकूर तसेच ऍड. माधवी निगडे यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. 

पंढरपूर/नातेपुते - श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीवर शासनाने गहिनीनाथमहाराज औसेकर यांची सहअध्यक्ष म्हणून निवड केली असून बुधवारी (ता. 4) आणखी सहा नवीन सदस्यांची नियुक्ती केली आहे. ज्ञानेश्‍वरमहाराज जळगावकर, शिवाजीराव मोरे, प्रकाश महाराज जवंजाळ, अतुलमहाराज भगरे गुरुजी, आमदार सुजितसिंह ठाकूर तसेच ऍड. माधवी निगडे यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. 

यापूर्वी कराड येथील भारतीय जनता पक्षाचे नेते डॉ. अतुल सुरेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली गहिनीनाथमहाराज औसेकर, आमदार राम कदम, भास्करगिरी गुरू किसनगिरी बाबा, सचिन अधटराव, संभाजी शिंदे, डॉ. दिनेश कदम, शकुंतला नडगिरे आणि पदसिद्ध सदस्य नगराध्यक्षा साधना भोसले यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली होती. परंतु त्या वेळी वारकरी प्रतिनिधींना या समितीवर पुरेसे स्थान मिळालेले नाही या कारणावरून ऐन आषाढी यात्रेच्या वेळी काही महाराज मंडळींनी पालख्या पंढरपूर शहरात प्रवेश करताना पालख्या थांबवून ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर देखील ज्ञानेश्‍वरमहाराज जळगावकर आणि अन्य काही मंडळींनी आंदोलन केले होते. त्या वेळी सदस्यांची संख्या वाढवून वारकरी प्रतिनिधींना त्यामध्ये जास्तीत जास्त स्थान दिले जाईल, असे आश्‍वासन देण्यात आले होते. 

श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समिती अधिनियमात दुरुस्ती करून एक सहअध्यक्ष आणि समितीच्या सदस्यांची संख्या 15 करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानंतर 15 जणांची स्वतंत्र सल्लागार समिती देखील नियुक्त करण्याचे शासनाने ठरवलेले आहे. राज्याच्या विधी व न्याय विभागाने नवीन सहा जणांची मंदिर समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती केल्याचे जाहीर केले आहे. 

मंदिर समितीवर वारकरी प्रतिनिधी आणखी घ्यावेत यासाठी आंदोलनाचे नेतृत्व केलेल्या ज्ञानेश्‍वरमहाराज जळगावकर यांच्यासह अन्य काही वारकरी सांप्रदायातील मंडळींना समितीवर स्थान देऊन शासनाने या संदर्भात दिलेले आश्‍वासन पूर्ण केले असल्याचे मानले जात आहे. ज्यांची मंदिर समितीवर नियुक्ती होऊ शकलेली नाही अशा अन्य इच्छुकांची सल्लागार समितीवर नियुक्ती होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. 

आता समितीवर सहा वारकरी प्रतिनिधी 
राज्य सरकारने नियुक्त केलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर समितीच्या नियुक्तीपासून वारकरी संप्रदायांत तीव्र असंतोष होता. वारकऱ्यांच्या भावनांची दखल घ्यावी म्हणून आषाढी वारीपासून राज्य शासनाकडे विविध प्रकारे आपल्या भावना कळविल्या जात होत्या, अनेकदा आंदोलने झाली. या आंदोलनांची दखल घेऊन सरकारने वारकरी प्रतिनिधी ज्ञानेश्‍वरमहाराज जळगावकर, देहूचे शिवाजीमहाराज मोरे, ऍड. माधवीताई निगडे (पुणे), प्रकाशमहाराज जवंजाळ यांची नियुक्ती केल्याने या आंदोलनास अंशतः यश मिळाल्याचे माउलींचे चोपदार व आंदोलनातील प्रमुख राजाभाऊ चोपदार यांनी "सकाळ'ला सांगितले. दरम्यान, पूर्वी नियुक्त केलेले गहिनीनाथमहाराज औसेकर, भास्करगिरीमहाराज यांच्यासह नवीन चार असे सहा वारकरी प्रतिनिधी मंदिर समितीवर गेले आहेत. आज नियुक्ती झालेल्यांत ज्योतिषतज्ज्ञ अतुलशास्त्री भगरे व आमदार सुजितसिंह ठाकूर यांचीही समावेश आहे.

Web Title: pandharpur news Shri Vitthal-Rukmini Temple Committee New members appointment