पंढरपूरमध्ये आंदोलन पेटले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

पंढरपूर - पुणे येथे रविवारी ऊसदर निश्‍चितीसाठी बोलावलेली बैठक निष्फळ ठरल्याने पंढरपूर विभागातील विविध शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. 

पंढरपूर - पुणे येथे रविवारी ऊसदर निश्‍चितीसाठी बोलावलेली बैठक निष्फळ ठरल्याने पंढरपूर विभागातील विविध शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. 

दरम्यान, आज आंदोलनकर्त्यांनी श्रीपूर, भाळवणी, मंगळवेढ्याकडे ऊस घेऊन जाणाऱ्या सुमारे १० ट्रॅक्‍टरचे टायर फोडले. यामध्ये ऊस वाहतूक ठेकेदारांचे सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आंदोलनामुळे आज दिवसभर ऊस वाहतूक ठप्प झाली होती. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील ऊसदराचा तोडगा निघाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊसदराचा योग्य तोडगा काढावा, अशी मागणी स्वाभिमानी, बळिराजा, रयत आणि मनसे या संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. परंतु तोडगा निघत नसल्याने संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे.

Web Title: pandharpur news sugarcane