"कोपर्डी'तील आरोपींना फाशी न झाल्यास आंदोलन - सुप्रिया सुळे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

पंढरपूर - कोपर्डी खटल्यातील आरोपींना येत्या तीन महिन्यांत फाशीची शिक्षा जाहीर न झाल्यास आपण स्वतः रस्त्यावर उतरून पंढरपूरपासून आंदोलनाला सुरवात करणार आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी येथे जाहीर केले. 

पंढरपूर - कोपर्डी खटल्यातील आरोपींना येत्या तीन महिन्यांत फाशीची शिक्षा जाहीर न झाल्यास आपण स्वतः रस्त्यावर उतरून पंढरपूरपासून आंदोलनाला सुरवात करणार आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी येथे जाहीर केले. 

"युवा संवाद'यात्रेच्या निमित्ताने आज सकाळी त्यांनी येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील युवक-युवतींशी संवाद साधला. याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष एस. एम. पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे आदी उपस्थित होते. सुळे म्हणाल्या, ""काल (सोमवारी) आपल्याला एका महाविद्यालयातील विद्यार्थिनीने कोपर्डी घटनेच्या संदर्भातील आरोपींना तातडीने शिक्षा व्हावी यासाठी तुम्ही काय केले, असा प्रश्‍न केला. तेव्हा त्या संदर्भात केलेल्या पाठपुराव्याची माहिती मी तिला दिली. येत्या तीन महिन्यांत या खटल्यातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली नाही तर मी रस्त्यावर उतरणार आहे.'' 

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. जी. जाधव यांच्या शिस्तीमुळे महाविद्यालयात कोणत्याही विद्यार्थिनीची छेडछाड होत नसल्याचे विद्यार्थिनींनी सांगितले. तेव्हा छेडछाड होत नाही ही अतिशय चांगली गोष्ट आहे. महाविद्यालयीन विद्यार्थिनींकडून त्या सुरक्षित असल्याचे ऐकण्याची माझी पहिलीच वेळ आहे, असे सांगून सुळे यांनी प्राचार्य व पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे यांचे कौतुक केले. 

"सरकार अपयशी ठरले' 
सोलापूर विद्यापीठाला नाव देण्याची मागणी दोन समाजांकडून केली जात आहे. त्या संदर्भात सर्वांशी चर्चा करून सरकारने निर्णय घेतला पाहिजे, असे मत सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. या सरकारला तटस्थ भूमिकेतून तुम्ही पाहिले तर किती गुण द्याल, या विषयाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, गुण नाही देऊ शकत; परंतु सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे, हे नक्की.

Web Title: pandharpur news supriya sule kopardi case