वारीच्या वाटेवरील वारकऱ्यांनी धरला 'संवाद वारी 'तील शाहिरांच्या डफावर ताल 

रमेश धायगुडे
शुक्रवार, 13 जुलै 2018

लोणंद : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गावर 'संवाद वारी' उपक्रम राबविण्यात येत आहे. छायाचित्र प्रदर्शन, पथनाट्य, चित्ररथ तसेच शाहिरीच्या  माध्यमातून शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती वारकरी व भाविकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान या उपक्रमांना वारीच्या वाटेवर सर्वच ठिकाणी वारकरी व भाविकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. 

लोणंद येथे श्री. संत ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळ्या दरम्यान गणेश मंदिर पटांगणावर झालेल्या शाहिरीच्या कार्यक्रमात शाहिरांनी डफावर ताल धरताच आणि 'जलयुक्त शिवार' योजनेचा उल्लेख करताच उपस्थित वारकऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात शाहीरांना साथ दिली. शाहिरांच्या प्रत्येक शब्दाला दाद देऊन वारकऱ्यांनी तल्लीन होऊन या योजनेची माहिती ऐकली. 

या उपक्रमाद्वारे शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांची माहिती शेतकरी व नागरिकांना मिळत असून हा उपक्रम कौतुकास्पद असल्याची भावना यावेळी अनेक वारकरी व भाविकांनी व्यक्त केली. 
त्यानंतर येथे झालेल्या पथनाट्यासही उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. 'संवाद वारी' उपक्रमांतर्गत पथनाट्यच्या माध्यमातूनही शासकीय योजनांचे प्रसारण करण्यात येत आहे. पथनाट्यातील कलाकारांना उपस्थित वारकरी मोठया प्रमाणावर प्रतिसाद देत आहेत.

Web Title: Pandharpur Wari 2018