पंडित अजित कडकडे श्री स्वामी समर्थ सेवा पुरस्काराने सन्मानित

akkalkoth
akkalkoth

अक्कलकोट - मी निष्काम माध्यम असून स्वामींची इच्छा असल्यानेच मला श्री स्वामी समर्थ सेवा पुरस्कार मिळाल आहे. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजय भोसले यांनी सुरु केलेली पालखी परिक्रमा ही देखील स्वामींच्या भक्तांची सेवा असल्याचे गौरवोद्गार पं. अजितकुमार कडकडे यांनी काढले.

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्यावतीने सुरु असलेल्या पालखी परिक्रमा पुणे येथील काँग्रेसभवन येथे पालखी पादुका दर्शनाच्या प्रसंगी रविवारी पंडित अजितकुमार कडकडेंना श्री स्वामी समर्थ सेवा पुरस्काराने स्वामीभक्त व पालखी संयोजकांनी देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी पं.कडकडे हे बोलत होते. 

यावेळी दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव गोडसे, पं.वसंतराव गाडगीळ, श्री दत्त मंदिर दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे अध्यक्ष शिरीष मोहिते, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले, सचिव शामराव मोरे, अण्णासाहेब थोरात, विजयराव काजळे, नामदेवराव मोहिते, डॉ.कसबेकर, विलास चव्हाण, शिरीष मावळे, राजाभाऊ वरखडे, छाया कडकडे, श्रीपाद थोरात, माऊली लोणार आदीसह हजारो स्वामीभक्त उपस्थित होते.यावेळी पुढे बोलताना पं.अजितकुमार कडकडे, यांनी मला मिळालेला पुरस्कार माझे गुरु पं.जितेंद्र अभिषेकी, स्वामीचरणी तमाम भक्तांना समर्पित करतो असे यावेळी कडकडे म्हणाले.

यावेळी जन्मेजय भोसले म्हणाले की स्वामी भक्तांची श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील अडचण दूर करु अशी ग्वाही दिली व भक्तांची सेवा, नम्र सुरक्षा, स्वच्छता याला महत्त्व देवून भक्तांच्या सेवेत कार्यरत असल्याचे भोसले यांनी सांगितले. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (अक्कलकोट) पालकी पादुका दर्शन सोहळा निमित्त आज पुणे येथील काँग्रेस भवनात रक्तदान महायज्ञ आयोजित केले. या शिबीरात सुमारे ५६ भाविकांनी रक्तदान केले आहे. रक्तदान महायज्ञ, रक्तदान श्रेष्ठदान असे या रक्तदान शिबिरात स्वामीभक्तांनी व माता भगिनी रक्तदान करून स्वामींना त्यांचे भक्ती अर्पण केले. संदीप ढवळे व राधिका शेलार यांनी श्री स्वामी समर्थ आणि महाआरतीचे सुंदर रांगोळी काढलं आहे. तसेच पुणेचे सरपळे डेकोरेशनचे कलाकारांनी सुंदर नक्षीकाम दीपोत्सव व फुलांच्या सजावट केले. तसेच सुमारे पाच दिवसात पंचवीस हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

सदरील कार्यक्रमास संतोष भोसले, संजय कुलकर्णी, शावरेप्पा माणकोजी, तानाजी पाटील, नवनीत पाटील, बसवराज क्यार, बाबासाहेब नुले, पद्माकर डिग्गे, श्रीशैल कुंभार, महांत स्वामी, महेश शिर्के यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचलन व आभार विनायक घाटे यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com