कवठेमहांकाळ नगराध्यक्षपदी पंडीत दळवी

कवठेमहांकाळ नगराध्यक्षपदी पंडीत दळवी

कवठेमहांकाळ - येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाचे पंडीत गंगाराम दळवी आणि उपनगराध्यक्षपदी खासदार संजयकाका पाटील गटाच्या सिंधूताई शिवाजी गावडे यांची बिनविरोध निवड झाली. नगरपंचायतीच्या सभागृहात पीठासीन अधिकारी डॉ. विकास खरात, मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी निवड जाहीर केली. निवडीनंतर खासदार संजयकाका पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या हस्ते सत्कार झाला.

नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी घोरपडे गटाचे नगरसेवक पंडीत दळवी यांचा नगराध्यक्षपदासाठी सोमवारी (ता.17) एकच अर्ज दाखल झाला होता. दरम्यान शुक्रवारी (ता.21) रोजी उपनगराध्यक्ष पदासाठी खासदार संजयकाका पाटील गटाच्या नगरसेविका सिंधूताई गावडे यांचा उपनगराध्यक्षासाठी अर्ज दाखल केला. पीठासीन अधिकारी डॉ. विकास खरात यांनी निवडी जाहीर केल्या.
याप्रसंगी नगरपंचायतीचे गटनेते चंद्रशेखर सगरे, अनिल लोंढे, हायुम सावनूरकर, चंद्रकांत हाक्के, पाडुंरंग पाटील, तुकाराम पाटील, दादासाहेब कोळेकर, सुनील पाटील, रणजित घाडगे, बाळासाहेब पाटील उपस्थित होते.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com