मोदी, शहांनी काही तरी शिकावे; जयंत पाटलांच्या व्हिडिओवरुन नेटीझन्सचा सल्ला

या व्हिडीओला नेटीझन्स संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत
मोदी, शहांनी काही तरी शिकावे; जयंत पाटलांच्या व्हिडिओवरुन नेटीझन्सचा सल्ला

सांगली : पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतीदिनानिमित्त जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अभिवादन करताना देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला नेटीझन्स संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. यावेळी नेटीझन्संनी प्रतिक्रीयेत मोदी, शहांनी यातून काहीतरी शिकावे असा सल्ला दिला आहे. (Pandit Jawaharlal Nehru Death Anniversary Minister Jayant Patil Share Atal Bihari Vajpayee Speech Video)

ट्वीटमध्य त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या त्या वेळेच्या संसदेतील भाषणाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात वाजपेयी म्हणतात, पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले, त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी हे या देशाच्या संसदेचे सदस्य होते. “भय व भूकमुक्त जगाचे एक स्वप्न उध्वस्त झाले असून, भारतमाता आज शोकाने भरून गेली आहे, भारतमातेने तिचा आवडता राजकुमार आज गमावला आहे. जागतिक शांततेचा पुरस्कार करणारा संरक्षक आता आपल्यात नाही. सूर्यास्त झाला असून आपल्याला आपला रस्ता शोधायला हवा. जरी आमच्यामध्ये मतभेद असले तरीही आम्हाला पंडितजींची आदर्श मूल्ये, देशाप्रतीचे प्रेम आणि असीम धैर्याबद्दल केवळ आदरच आहे, असे अटल बिहारी वाजपेयी यांनी एका भाषणात म्हटलं होतं.

मोदी, शहांनी काही तरी शिकावे; जयंत पाटलांच्या व्हिडिओवरुन नेटीझन्सचा सल्ला
'मराठा समाजाने रस्त्यावर उतरून संघर्ष केला नाही तर वेळ निघून जाईल'

दरम्यान जयंत पाटील यांनी या भाषणाची आठवण करुन देत भाजपाला चिमटा काढला आहे. अटलबिहारी वाजपेयी यांनी पंडित नेहरू यांचा उल्लेख 1999 च्या अविश्वास ठरावा वेळीही आपल्या भाषणात केला होता. ते भाषण सोबत व्हिडिओ स्वरूपात आहे. यातूनच पंडित नेहरूंची महानता लक्षात येते, असे जयंत पाटील म्हणाले.

पंडित नेहरु हे व्यक्ती, स्वातंत्र्यसैनिक म्हणून महान होतेच. शिवाय देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून देश उभारणीत त्यांचा महत्त्वाचा आणि उल्लेखनीय वाटा होता. त्यांनी नेहमीच विरोधी विचारांचा आदर केला आहे. लोकशाहीच्या मूल्यांना अग्रस्थानी ठेवून संसदेला सर्वोच्च मानले आहे. असा टोलाही त्यांनी लगावला. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतीदिनानिमित्त जयंत पाटील यांनी अभिवादन केले. (Pandit Jawaharlal Nehru Death Anniversary Minister Jayant Patil Share Atal Bihari Vajpayee Speech Video)

मोदी, शहांनी काही तरी शिकावे; जयंत पाटलांच्या व्हिडिओवरुन नेटीझन्सचा सल्ला
दिल्लीतही राज्य करतो, देवगडचा राजा; महिलांचा प्रयोग यशस्वी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com