राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी पांडुरंग अभंग 

सुनिल गर्जे
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

नेवासे : नेवासे-शेवगाव तालुक्याचे माजी आमदार व ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग अभंग यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवडीचे वृत्त समजताच कुकाणे-भेंड्यासह राष्ट्रवादीच्या कार्येकर्त्यांनी एकाच जल्लोष करत फटाक्याची आतषबाजी केली. त्यांच्या निवडीचे नेवासे तालुक्यातून जोरदार स्वागत करण्यात आले.

नेवासे : नेवासे-शेवगाव तालुक्याचे माजी आमदार व ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग अभंग यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवडीचे वृत्त समजताच कुकाणे-भेंड्यासह राष्ट्रवादीच्या कार्येकर्त्यांनी एकाच जल्लोष करत फटाक्याची आतषबाजी केली. त्यांच्या निवडीचे नेवासे तालुक्यातून जोरदार स्वागत करण्यात आले.

माजी आमदार अभंग हे 1995 मध्ये नेवासे-शेवगाव विधानसभा मतदार संघातून काँग्रेसच्या तिकिटावर तत्कालीन आमदार तुकाराम गडाख यांचा विरुद्ध अवघ्या 11 मतांनी निवडून आले होते. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांनी काँग्रेस मधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली त्यावेळी पवारांना लोकनेते (स्व) मारुतराव घुले पाटील यांनी साथ करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी पांडुरंग अभंग यांनी आमदारकीचा विचार न करता काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व घुले पाटील यांच्यावर अभंग यांची असलेली निष्ठा सर्वसृत आहे. प्रामाणिक, स्वच्छ चारित्र्याचा कार्यकर्ता म्हणून त्यांचा राज्याच्या राजकारणात लौकिक आहे. 

अभंग यांच्या पवार-घुले घराण्याशी असलेल्या एकनिष्ठेमुळे अल्पसंख्याक असून ही त्यांना विधानसभा, साखर कारखाना, जिल्हा बँक, शिर्डी संस्थान, ज्ञानेश्वर संस्थांन, समता परिषद, राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य, जिल्हाध्यक्ष आदी पदे मिळाली. या सर्व पदांवर काम करतांना त्यांनी प्रत्येक ठिकाणी आपली वेगळी प्रतिमा निर्माण केली. मारुतराव घुले पाटील यांच्या निधनानंतरही घुले बंधूंच्या यांचे पाठीशी भक्कमपणे उभा असणारे नेतृत्व म्हणून ही त्यांच्याकडे पाहिले जाते. असा या नेतृत्वाची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रेदश उपाध्यक्षपदी झालेल्या निवडीचे सर्वस्तरातून स्वागत करण्यात येत आहे.

अभंग यांच्या निवडीची बातमी समजताच कुकाणे, भेंडे येथे राष्ट्रवादीसह विविध सामाजिक संघटनाच्या कार्येकर्त्यांनी फटाके फोडून त्यांच्या निवडीचे स्वागत झाले.

Web Title: Pandurang Abhanga becomes the Deputy Vice President of NCP's state