पन्हाळा येथे आरक्षित जागेवर कुंपन प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल 

पन्हाळा येथे आरक्षित जागेवर कुंपन प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल 

आपटी - पन्हाळा येथील शिवस्मारक व उद्यानासाठी आरक्षित केलेल्या सिटी सर्व्हे नंबर ६३५ च्या रिकाम्या जागेवर अनाधिकृतपणे जागा सपाटीकरण करून तारेचे कुंपण घातल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकाराबाबत नगर परिषदेने कुंपण घालणाऱ्या खासगी मालकास नोटीसा
देऊनही काहीही कार्यवाही न केल्याने याबाबत पन्हाळा नगरपरिषदेच्या कनिष्ठ बांधकाम पर्यवेक्षक स्नेहल पन्हाळकर यांनी पन्हाळा पोलिसात रीतसर फिर्याद दाखल केली आहे.

पन्हाळा येथील सिटी सर्व्हे नंबर ६३५ ची जागा जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचेकडून  नगरपरिषदेकडे  हस्तांतरित केलेली असून ती नगरपरिषदेच्या वहिवाटीस आहे. ही जागा नगर परिषदेच्या ताब्यात आहे. असे असतानाही नगरपरिषदेची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता नगरपरिषदेच्या व शासनाच्या जागेत कमलाकर दत्ताजीराव धनवडे यांनी अनधिकृतपणे प्रवेश केला व  सि. स. नंबर ६३५ मधील जागेवर अनाधिकृतपणे जागा सपाटीकरण करून खासगी तारेचे कुंपण घालणेसाठी सिमेंटचे डांब उभारले आहेत. याबाबत धनवडे हे कोल्हापूर येथे राहत असल्याने त्यांना २७ सप्टेंबर २०१८ रोजी रजि. पोष्टाने नोटीस पाठविली होती. त्या बाबत त्यांनी कोणतीही कार्यवाही न केल्याने त्यांचेवर फिर्याद केल्याचे याबाबत पन्हाळा पोलिसात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com