पाणी फॉउंडेशनच्या वतीने संस्था, व्यक्तींचा सन्मान

हुकूम मुलाणी
मंगळवार, 31 जुलै 2018

मंगळवेढा : पाणी फॉउंडेशनच्या वतीने तालुक्यातील दहा गावात राबविण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामात योगदान दिलेल्या संस्था व व्यक्तीसाठी गौरव जलरत्नांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन 3 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वा. श्री. संत दामाजी महाविद्यालयात होणार करण्यात आल्याची माहीती समन्वयक श्रीनिवास गंगणे यांनी दिली. 'बोलो मिलके एक साथ, दुष्काळाशी दोन हात' हे ब्रीदवाक्य घेवून दुष्काळी तालुक्यातील 10 गावे 
सहभागी झाली.

गावकऱ्यांच्या श्रमदानाच्या चळवळीत भारतीय जैन संघटना, वारी परिवार, धनश्री परिवार, स्व. रतनचंद शहा सहकारी अर्बन बँक, सोमलिंग ग्रामविकास मंडळ, गुंजेगाव, स्वेरी इंजिनियरींग कॉलेज पंढरपूर, श्री संत दामाजी कॉलेज, अस्तित्व संस्था, सांगोला, जे एम म्हात्रे कंट्रक्शन कंपनी पुणे, सी पी बागल कंट्रक्शन कंपनी पंढरपूर, एस एम आवताडे कंट्रक्शन कंपनी, सकाळ तनिष्क फंड सोलापूर यांनी योगदान दिल्यामुळे श्रमदानातून - 25513(घ.मी) तर यंत्राच्या सह्याने 623207(घ.मी) काम झाल्यामुळे भविष्यात मोठा प्रमाणात पाणीसाठा होणार आहे.

नर्सरीत- 54100 रोपे लोकसहभागातून तयार करण्यात आली. स्पर्धे मध्ये सहभागी गावांना श्रमदानातून किंवा आर्थिक मदत केलेले  गाव पातळीवरील शासकीय अधिकारी- ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, अंगणवाडी सेविका व मदतनीस, भूमीपुत्र, शिक्षक, निवृत्त प्रशासकीय अधिकारी यांचाही गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी जितेंद्र गडहिरे, वशीम शेख, वैभव इंगळे, वैभव जगदाळे हे परीश्रम घेत आहेत.

Web Title: Pani Foundation Honor of the People