टोळेवाडीत जमीन खचल्यामुळे घबराट

सुनील शेडगे 
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

नागठाणे : परिसराच्या पश्चिम भागात डोंगरावर असलेल्या टोळेवाडी (भैरवगड, ता. सातारा) येथे जमीन खचल्यामुळे ग्रामस्थांत घबराट निर्माण झाली आहे. प्रशासनाने सर्व ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलविले आहे.

नागठाण्याच्या पश्चिमेस असलेल्या डोंगरावर भैरवगड ग्रामपंचायत आहे. त्यात टोळेवाडी, पिरेवाडी, गवळणवाडी, मानेवाडी या वाड्यांचा समावेश आहे. त्यातील टोळेवाडीत जमीन खचण्याचा प्रकार घडला. या ठिकाणी 80 ते 90 घरे आहेत. त्यातील बहुतेक घरांना भेगा पडल्या आहेत. काही घरात पाणी येण्याचे प्रकार घडले आहेत.

मांडवेतून पुन्हा आसनगाकडे येणारा डांबरी रस्ता आहे. या रस्त्याला मोठ्या भेगा गेल्या आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यालगतची, शेतातील जमीन खचली आहे. त्यामुळे ग्रामस्थांत एकच घबराट निर्माण झाली. याबाबतची माहिती मिळताच आमदार बाळासाहेब पाटील, प्रांताधिकारी स्वाती देशमुख, तहसीलदार आशा होळकर यांनी टोळेवाडीस भेट देऊन परिस्थितीची पाहाणी केली. तलाठी राम कुंभार, ग्रामसेवक नीलेश गुरव, सरपंच रामचंद्र साळुंखे हेदेखील दिवसभर परिस्थिवर लक्ष ठेवून होते.
पंचनामा, नुकसानीचे कामही सुरु होते.

प्रशासनाची तत्परता

प्रशासनाने तत्परतेने गावातील लोकांना बाहेर काढले आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून मांडवे येथील प्राथमिक शाळा, टोळेवाडीतील शाळा, अंगणवाडी या ठिकाणी ग्रामस्थांची तात्पुरती सोय करण्यात आली आहे. काहींनी आपल्या नातेवाईकांच्या घरांचा अासरा घेतला आहे.

" ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. मात्र जनावरांचा प्रश्न आहे. पावसामुळे परिस्थिती बिकट बनली आहे. लवकरात लवकर सुविधा मिळाव्यात." भरत साळुंखे, ग्रामस्थ

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Panic due to landslides in Tolewadi