पानसरे हत्येचा तपास महत्त्वाच्या टप्प्यावर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 मे 2017

कोल्हापूर - शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे समता संघर्ष समितीतर्फे आज ताराबाई पार्क येथे निर्भय मॉर्निंग वॉक उपक्रम घेण्यात आला. यात पहिल्यांदाच पोलिस अधिकाऱ्यांचा सहभाग पाहायला मिळाला. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी ज्येष्ठ नेते पानसरे यांच्या हत्येचा तपास महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. लवकरच मारेकऱ्यांपर्यंत पोचू, असा विश्‍वास यावेळी व्यक्त केला. 

कोल्हापूर - शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे समता संघर्ष समितीतर्फे आज ताराबाई पार्क येथे निर्भय मॉर्निंग वॉक उपक्रम घेण्यात आला. यात पहिल्यांदाच पोलिस अधिकाऱ्यांचा सहभाग पाहायला मिळाला. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी ज्येष्ठ नेते पानसरे यांच्या हत्येचा तपास महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. लवकरच मारेकऱ्यांपर्यंत पोचू, असा विश्‍वास यावेळी व्यक्त केला. 

आज ताराबाई पार्क येथे निर्भय मॉर्निंग वॉक उपक्रम घेण्यात आला. ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली याची सुरवात झाली. ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर, प्रा. डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांना पकडावे म्हणून दर महिन्याच्या २० तारखेला हा उपक्रम घेतला जातो. यात पोलिसांच्या तपासाबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जाते. मात्र आज पहिल्यांदाच पोलिस प्रतिनिधी म्हणून खुद्द विशेष पोलिस महानिरीक्षक व पोलिस अधीक्षक संजय मोहिते हे या वॉकमध्ये सहभागी झाले. वॉकची सुरवात नाना-नानी पार्क येथून झाली. यावेळी डॉ. एन. डी. पाटील म्हणाले, ‘‘आजचा मॉर्निंग वॉक ही विवेकाची ज्योत आहे. आमच्या महान कार्यकर्त्यांच्या त्यागातून, बलिदानातून ही ज्योत पेटवली आहे. ती कदापि विझणार नाही. हा आमचा छोटा प्रयत्न आहे. त्याचा वटवृक्ष होईल.’’ 
पितळी गणपती, धैर्यप्रसाद कार्यालय, अजिंक्‍यतारा, एमएसईबी, आरटीओ कार्यालय मार्गे सार्वजनिक बांधकाम विभाग येथे वॉकची सांगता झाली.

याप्रसंगी नांगरे-पाटील म्हणाले, ‘‘पानसरे यांच्या हत्येचा तपास आता विशिष्ट टप्प्यावर आहे. एसआयटीमार्फत तपास सुरू आहे. तपासासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. लवकरच मारेकऱ्यांपर्यंत पोचू, असा आमचा विश्‍वास आहे.’’ या वेळी दिलीप पवार, उदय नारकर, सीमा पाटील, संभाजी जगदाळे, के. डी. खुर्द, शाहीर राजू राऊत, नीता पाटील, अशोक गगराणी, प्राचार्य टी. एस. पाटील, मेघा पानसरे, निवृत्त पोलिस उपअधीक्षक दिलीप पाटील, स्वप्ना गर्दे, गौरी घोलकर, फायजा शिराळे, सुनीता शेंडे, सुनीता मांगले, सुनीता व्हराळे, मानसी कुलकर्णी, विश्‍वनाथ लिगाडे, पांडुरंग कांबळे, एस. बी. पाटील, धनंजय सावंत, अरुण पाटील, दिलीप पाटील, बळीराम कांबळे, हसन देसाई, रमेश आपटे, शैलजा पाटील, वासंती पोवार, उषा लगंडे, स्नेहल कुलकर्णी, यशदा शिंगाडे, संजय खुर्द, रघुनाथ कांबळे आदी उपस्थित होते.

Web Title: pansare murder inquiry important point