जिल्हा परिषदेच्या शाळेबद्दल पालकांच्या मनात विश्वास :मारुती फडके

राजकुमार शहा 
रविवार, 17 जून 2018

मोहोळ : शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या  विविध शाळात  2400 विधार्थ्यानी प्रवेश घेतला असुन जिल्हा परिषदेच्या शाळेबद्दल पालकांच्या मनात विश्वास निर्माण झाला असल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी मारुती फडके यांनी दिली 

मोहोळ : शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या  विविध शाळात  2400 विधार्थ्यानी प्रवेश घेतला असुन जिल्हा परिषदेच्या शाळेबद्दल पालकांच्या मनात विश्वास निर्माण झाला असल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी मारुती फडके यांनी दिली 

पंधरा जुन रोजी मोहोळ शहरासह तालुक्याच्या ग्रामिण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत नवोदित विध्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठया धुमधडाक्यात व विविध उपक्रमानी साजरा करण्यात आला चालु वर्षीचा प्रवेशोत्सव पाहिला व त्याची तुलना केली तर जि प शाळांच्या गुणवतेचा टक्का वाढल्याचे चित्र आहे पुर्वी  पालकांचा आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत घालण्याकडे कल होता मात्र चालु वर्षी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील 71 विध्यार्थ्यानी जि प शाळेत प्रवेश घेतला आहे एकुण 3120 विध्यार्थी दाखलपात्र आहेत त्यापैकी 2392 विध्यार्थ्यानी प्रवेश घेतला आहे उर्वरीत प्रवेशाच्या मार्गावर आहेत 

शिक्षण विभागाचे अधिकारी विस्तार अधिकारी शिक्षक यांनी शोध घेऊन अकरा शाळाबाहय विध्यार्थ्याना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे पाहिल्या दिवशी गट विकास अधिकारी अजिंक्य येळे गटशीक्षणाधिकारी मारुती फडके विस्तार अधिकारी हरिष राऊत सभापती समता गावडे उपसभापती साधना देशमुख त्या त्या परिसरातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांनी शाळेला भेटी दिल्या शाळेत येणाऱ्या आधी काऱ्यांच्या सत्कारासाठी लागणारे पुष्पहार शाल फेटा यावर होणारा अनावश्यक खर्च टाळुन  त्या ऐवजी अधिकाऱ्यiना पुस्तके भेट देण्याचा नवीन उपक्रम तालुक्यातील  शाळानी सुरू केला आहे.

चालु शैक्षणिक वर्षापासुन शाळेत प्रगत व अप्रगत विध्यार्थी किती याचा माहेनिहाय आढावा तक्ता स्वरूपात माहिन्याच्या महिन्याला वरिष्ठांना सादर करावयाचा आहे त्यामुळे अप्रगत विध्यार्थ्यांची संख्या कमी होणार आहे तसेच या अगोदरच्या शिक्षकाने कांहीच शिकविले नाही या शिक्षकांच्या वृतीला मोठा चाप बसणार आहे

Web Title: Parents believe in Zilla Parishad's school said Maruti Phadke