दिव्यांग मुलांच्या सुखासाठी पालकांनी केले "हे'काम 

सुस्मिता वडतीले
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

- संगणकीकृत अभ्यासक्रमाची सोय 
- 100 प्रकारची लावली झाडी 
- दिव्यांग मुलांचेही झाले उच्च शिक्षण 

सोलापूर : आई- वडीलांसारखे दैवत नाही हे बऱ्याचदा आपण ऐकलं आहे,
 त्या आई- वडीलांना सलाम! येथील भवानी पेठमध्ये सुधाकर यलगम यांनी त्यांच्या वर्षा व नवल या दिव्यांग मुलांसाठी स्वत: च्या घरात सुंदर बाग फुलवली आहे. 

सुवर्णाताई घालतायेत दुचाकीवरून दुधाचा वरवा

वर्षा व नवल यांना सर्व वृक्षाची माहिती आणि त्याचा सहवास लाभावा यासाठी 100 च्यावर विविध प्रकारची झाडे त्यांनी लावली.
 त्यात अशोका, चाफा, मोगरा, कन्हेरी, रातराणी, पारिजातक, जास्वंद, लाजाळूची झाड, मनी प्लांट, वागनकी, तुळस, बांबू, कोरफड, निशीगंधा, 
पाम ट्री, जाईजुई, रबर, गुलाब, अरेका पाम, चायनीज एवरग्रीन, मासकेन, फायकस अल्ली, बोस्टन फेर्न, शोभेची झाडे अशी अनेक झाडी लावण्यात आली आहे.
 तसेच सुधाकर यलगम यांची मुलगी वर्षा यलगम हे दिव्यांग असून त्यांचे शिक्षण बी.कॉमपर्यंत बुर्ला महिला महाविद्यालयात पूर्ण झाले आहे. तसेच त्यांचे बंधू नवल यलगम हे बारावी पर्यंतचे शिक्षण आसावामधून पूर्ण केले आहे. 

अौषधं घेऊन येईपर्यंत `तोॊ झाला गायब

मुलांच्या अंतर्गत प्रतिभा जाणून घेण्यासाठी आणि मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक पालकांची चांगल्या शाळेत आपल्या मुलांना प्रवेश घेण्याची इच्छा असते. परंतु आर्थिक परिस्थितीमुळे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहू नये या उद्देशाने लिली 
नर्सरी स्कूलची 2010 साली सुरुवात केली. तसेच पूर्ण सोशल मिडियाच्या माध्यमातून सर्व नर्सरीचे कामे घरीच बसून करत आहे. दोघेही बहीण भाऊ दिव्यांग असूनही मागे न खचता आज चांगले कार्य करत आहे. यरगल कुंटुंबाने आपल्या दिव्यांग मुलांचा वेळ,
 त्यांना विरंगुळा मिळण्यासाठी घरामध्येच गेली दहा वर्षापासून नर्सरी आणि बाग सुरु केली आहे. यांच्या येथे नर्सरी एक वर्षाचे आणि प्लेपग्रुप दोन वर्षाचे असून या नर्सरीत एकूण 35 विद्यार्थी शिकत आहे. या विद्यार्थ्यांना अभ्यास शिक्षणासोबतच वेगवेगळे कलागुणांना वाव दिले जाते त्यात अभ्यास, चित्रकला, व्यायाम, प्रार्थना उपक्रम आणि स्पर्धा ही शाळेची मुख्य वैशिष्टये आहेत. 

कॅसमुळे अंगणवाड्या आॅनलाईन

मुलांना अभ्यासाव्यतिरिक्त थोडसं वेगळ म्हणून सहल काढली जाते. रेनी सिझन, आईस्क्रिम पार्टी, गोकुळाष्टमी, शिक्षक दिन, बाल दिन आणि बरचं काही त्यांच्यासोबत केले जाते.शाळेचे संगणिकीकृत अभ्याक्रम असून स्क्रीन ऍन्ड बुक टीचिंगच्या मदतीने स्मार्ट स्टडीद्वारे मुलांना शिकवले जाते.
 या नर्सरीमुळे अनेक विद्यार्थी नव्याने खूप शिकत आसल्यामुळे स्वामी नारायण गुरुकूल, एम.आय.टी.पुणे, ऑर्किड स्कूल, आणि सिध्देश्‍वर मॉन्टेनरी स्कूल या शाळांनी नर्सरीतील विद्यार्थ्यांची मागणी करत आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parents work for the happiness of children with disabilities

फोटो गॅलरी