इथं हवेत सम, विषम, नो पार्किंग फलक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 मार्च 2017

सातारा - वाहतूक नियमनामध्ये वाहनचालकांना सूचना देणारे फलक महत्त्वाची भूमिका बजावत असतात. मात्र, शहरामध्ये बहुतांश ठिकाणी या फलकांचा अभाव आहे. सुधारित वाहतूक आरखड्यात बांधकाम विभाग व नगरपालिकेने कोणत्या ठिकाणी कोणते फलक आवश्‍यक आहेत, याचाही आढावा घेतला आहे.

सातारा - वाहतूक नियमनामध्ये वाहनचालकांना सूचना देणारे फलक महत्त्वाची भूमिका बजावत असतात. मात्र, शहरामध्ये बहुतांश ठिकाणी या फलकांचा अभाव आहे. सुधारित वाहतूक आरखड्यात बांधकाम विभाग व नगरपालिकेने कोणत्या ठिकाणी कोणते फलक आवश्‍यक आहेत, याचाही आढावा घेतला आहे.

पार्किंग फलक
माजी राज्यपाल गणपतराव तपासे रस्त्यावर सम पार्किंग फलकांची ठिकाणे-म्हसवडकर दुकान, हिरवे हॉस्पिटल रस्ता, लाहोटी कॉम्प्लेक्‍स, हॉटेल राधिका, हॉटेल राधिका पॅलेस रिक्षा थांबा, मुथ्थुट फायनान्स, सितारा हॉटेल. विषम पार्किंग फलक- कच्छी किराणा, सातारा सिटी बिझनेस सेंटर, शिवसेवा हॉटेल, अक्षय प्रिंटर्स, युनियन बॅंक, इलेक्‍ट्रीक डिपीजवळ, तालुका पोलिस ठाणे. 

मोती चौक ते राधिका चित्रपटगृह रस्त्यावर तीन ठिकाणी सम तर, पाच ठिकाणी विषम तारीख फलक लावण्याची आवश्‍यकता आहे. सम पार्किंग-साठे जनरल स्टोअर्स, सजावट फर्निचर, हेल्थ केअर. विषम पार्किंग - काटदरे मसाले दुकान, पवार प्राइड, लक्ष्मी स्टोअर्स, शारंगधर औषध, राधिका चित्रपटगृह.

मोती चौक ते अलंकार हॉल दरम्यान सम पार्किग-तालीम संघ मैदानासमोर, जयहिंद हॉटेल समोर, डान्स ॲकॅडमी, पवार हाईटस, राजे ॲकॅडमी, विमल एम्पायर, देवी चौक कॉर्नर, जनता सहकारी बॅंक, सिलेक्‍शन कापड दुकान व सातारा प्लायवूड दुकान. विषम पार्किंग-डॉ. मोहन पाटील दवाखाना, लहुजी वस्ताद पुतळा, शाही मशिद, चाटे कोचिंग क्‍लास, मुरलीधर ग्लास सेंटर, श्री चेंबर्स, कन्याशाळा, मारवाडी चौक कॉर्नर. 

गिते बिल्डिंग ते पोवई नाका मार्गावर सम पार्किंग-पारिजात मेडिकल, आदर्श कॉम्प्युटर, मॉडर्न बेकरी. विषम पार्किंग-आदिती मोबाईल, पाटील वडापाव, शिवशक्ती कॉम्प्लेक्‍स. प्रिया व्हरायटी ते मनाली हॉटेल दरम्यान सम पार्किंग-प्रिया व्हरायटी, जगताप कम्युनिकेशन, सागर मोबाईल, चाऊस स्पिकर, राजश्री लॉटरी, सातारा चिकन सेंटर, रविराज किराणा, यश इन्स्ट्यिूट, प्रिया व्हरायटी कॉर्नर, घागरीवाले दुकान, हनुमान मंदिर, सायली आर्ट, खंडोबा मंदिर, सागर इलेक्‍ट्रीकल, मार्केट यार्ड गेटजवळ व मनाली हॉटेल.

मोती चौक ते तांदूळ आळी रस्त्यावर सम पार्किग फलक-भवानी स्विट, साईनाथ हॉटेल. विषम पार्किंग -शिवकृपा पतपेढी, किराणा दुकानाजवळ. मारवाडी चौक ते सम्राट चौक दरम्यान सम पार्किंग फलक- नवरंग दुकान, लाहोटी किराणा.विषम पार्किंग-खुटाळे भांडी दुकान, बुलडाणा अर्बन बॅंक. मारवाडी चौक ते न्यू इंग्लिश स्कूल दरम्यान सम पार्किंग फलक-खंडेलवाल दुकान, सचिन किराणा, सायगाव हेअर कटिंग, विषम पार्किंग-अक्षयराज शॉपी, वसंत टेलर. राधिका चित्रपटगृह ते बारटक्के चौक दरम्यान सम पर्किंग फलक-राधिका चौक कॉर्नर, अकबर ॲटो. विषम पार्किंग-राधिका संकुल, बारटक्के चौक. देवी चौक ते जीवनज्योत रुग्णालयादरम्यान सम पार्किंग फलक-अमर भवन, चंदू टेलर, चिंतामणी नर्सिंग होम, विषम पार्किंग-आम्रपाली हॉटेल, जीवनज्योत रुग्णालय. शेटे चौक ते कमानी हौद दरम्यान सम पार्किंग फलक-कोटेश्‍वर संतोष अपार्टमेंट, रुक्‍मिणी कुंज व राज टेलर. विषम पार्किंग-साळुंखे मांडववाले, दर्पण पार्लर, महालक्ष्मी फॅशन समर्थ ड्रायक्‍लिनिंग. 

नो पार्किंग फलक
राजवाडा ते समर्थ मंदिर रस्त्यावर-बादापुरे प्रोव्हिजन स्टोअर्स, विजय जनरल स्टोअर्स. मोती चौक ते गोलबाग दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूस तसेच प्रतापसिंह हायस्कूल समोर, अभयसिंहराजे भोसले व्यापारी संकुल, अजिंक्‍य गणेश मंदिरासमोर व गोलबागेच्या समोर आणि पाठीमागे. मोती चौकात-न्यू आराम हॉटेल, देवकुळे वॉच, लाटकर स्विट्‌स, देवी ज्वेलर्स. पोवई नाक्‍यावर ॲब्रोसिया बेकरी समोर. रुपसमीर चौक ते गुलबहार हॉटेल दरम्यान-मेहता कम्युनिकेशन, बढीये पेट्रोलपंप, रुपसमीर ते बांधकाम विभाग भिंत दोन फलक. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय तसेच मराठा खानावळीसमोर. राधिका सिग्नल ते सागर डिलक्‍स हॉटेल दरम्यान -भारत गॅस समोर, मार्केट यार्ड रिक्षा थांबा, शिवराज ऑप्टिकल व कदम पेट्रोल पंपाजवळ. पोवई नाका ते मुख्य बस स्थानक रस्त्यावर-शिवाजी संग्रहालय, हॉटेल व्हाईट हाऊससमोर, कृषी कांचन दुकानासमोर, ज्ञानदीप को- ऑपरेटिव्ह पतसंस्था, तहसीलदार कार्यालय व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेसमोर, हॉटेल शिवसागरसमोर, सभापती निवासस्थानासमोर दोन्ही बाजूला.

उजवीकडे वळण्यास मनाई फलक
मोती चौक ते गोलबाग ते जिल्हा मध्यवर्ती बॅंक रस्त्यावर गोलबागेसमोर, कालिदास पेट्रोल पंपाजवळ, हॉटेल भारत भुवन बॅरिकेट जवळ, राधिका सिग्नल दोन ठिकाणी, यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालय ते रूपसमीरकडे येणारा व कोरेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर रूपसमीर सिग्नलजवळ या ठिकाणी उजवीकडे वळण्यास मनाई असल्याचे फलक लावण्याची गरज आराखड्यात मांडण्यात आली आहे.

Web Title: parking issue