पारनेर - मुलिंच्या शाळेसाठी स्वतंत्र इमारतीची मागणी

parner.
parner.

पारनेर - शहरात पहीली ते चौथीच्या मुली व मुलांची स्वतंत्र शाळा आहे. मुलींसाठी फक्त स्वतंत्र कागदोपत्री प्रत्यक्षात इमारत नसलेली शाळा आहे. मुलींच्या शाळेत 66 सावित्रीच्या लेकी एका सामाजिक भवनात शिक्षण घेत आहेत. तेथे एकीत्रीत तीन वर्ग एकाच खोलीत भरत आहेत तर एक वर्ग एका खाजगी इमारतीच्या गाळ्यात भरत आहे.

पुरूष प्रधान समाजात महिलेच्या वाट्याला मिळणारी सापत्नपणाची वागणुक आजही या शाळेत आहे की काय असेच म्हणावे लागेल कारण यंदाचे शैक्षणिक वर्ष संपत आले. तरीही मुलींना आपल्या हक्काची शाळा मिळाली नाही. यात राजकिय अनास्था म्हणावी की अधिका-यांची चलढकल हे मात्र समजत नाही. मात्र गेली वर्षभरापासून आमच्या या सावित्रीच्या लेकी मात्र ऊप-या सारख्या बाजारतळावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात शिक्षणाचे धडे गिरवत ऊद्याचे भविष्य शोधत आहेत. 

येथील मुलींच्या शळेत तीन शिक्षिक आहेत त्या पैकी दोघे जण बाजार तळावरील तर एक जण एका खाजगी गाळ्यात आपल्या मुलांना शैक्षणिक ज्ञानदानाचे काम करत आहेत. या मुलींना गेल्या वर्षभरापासून आपली हक्काची शाळा असावी अशी अपेक्षा आहे मात्र निम्मे शैक्षणिक वर्ष संपत आले तरीही त्यांना आपल्या हक्काची शाळा मिऴळाली नाही. या मुलींची शिक्षणाची परवड थांबली नाही. 

बाजारतळावरील डॅा. बाबासाहेब आंबेडकर भवनात शिक्षणाचे धडे गिरवत असलेल्या  या गोरगरीबांच्या मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष देण्यास राजकिय नेत्यांसह सरकारी अधिका-यासह  वेळ नाही. 

शहरातील जिल्हापरीषदेची  मुलींची शाळा सन 1912 साली बांधलेली असून ती सुमारे 105 वर्षापुर्वीची आहे. त्या ठिकाणी आठ खोल्या आहेत मात्र या आठही खोल्या अखेरची घटका मोजत आहेत. ही सर्वच इमारत  अता अतीशय जीर्ण झाली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी मुलींना बसविणे धोक्याचे असल्याने या शैक्षणिक वर्षाच्या सुरूवाती पासूनच मुलींना बाजारतळावरील एका सांस्कृतिक भवनात तीन वर्ग व एक वर्ग एका खाजगी खोलीत भरत आहेत. 

समाज मंदीरात एकाच ठिकाणी तीन वर्ग एकत्रीत भरविले जात आहेत. या ठिकाणी शिक्षकांना धड शिकविताही येत नाही. या ठिकाणी शिकणा-या सर्व मुली गरीबा घरच्या आहेत. ज्या मुलींना महागडे खाजगी शाळेतील किंवा इंग्रजी माध्यामाचे शिक्षण घेणे परवडणार नाही अशाच मुली येथे शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. 

केवळ शिक्षणाची जिद्द व आईवडीलांची इच्छा म्हणून या मुली जिद्दीने अशाही कठीण व  अडचणीच्या अवस्थेत या मुली शिकण घेत आहेत. 
पारनेर शहरात एक ते चार इयेत्तेत शिक्षण घेत असलेली 
मुले-63
मुली-66
शिक्षक- 06
पाहीजे असलेल्या खोल्या - 08
फक्त मुलांच्या शाळेसाठी प्रत्यक्षात ऊपलब्ध खोल्या-03
मुलींसाठी-00

तालुक्यात एकूण 116 वर्ग खोल्यांची मागणी.
पटानुसार मुले व मुलींच्या शाळेत शिक्षक संख्या आहे. मात्र मुलींना बसण्यास तीन वर्ग खोल्यांची गरज आहे. मुलांच्या शाळेत पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने आम्हास मुलांना पिण्यासाठी विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. मुलीसाठी तीन वर्ग खोल्यांची नितांत गरज आहे तशी आम्ही जिल्हापरीषदेकडे मागणी केली आहे. -के.बी. नरसाळे, केंद्रप्रमुख पारनेर
    

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com